संदीप कांबळे,कामठी
–ठिकठिकाणी दिसताहेत स्मोकिंग झोन
कामठी ता प्र 22:-शासनाने सार्वजनिकरित्या धूम्रपान करणाऱ्यांवर बंदी लावली आहे.मात्र या कायद्याला बगल देत शहराच्या आतील बहुतांश पानटपऱ्यावर हुक्का पार्लर तसेच स्मोकिंग झोन निर्माण झाल्याचे वास्तव आहे.
या स्मोकिंग झोन मध्ये येणारे बहुतांश मुले ही अल्पवयीन व विदयार्थी असल्याचे दिसून येत आहेत.अनेक उच्चभ्रू घरातील शिक्षण घेणारी मुले फॅशन म्हणून सिगारेट ओढण्याचा शौक करोत आहेत .घरातून भरपूर पाकिटमनी मिळत असल्याने त्यांना पैस्याची वणवा नसते यामुळे परिचित व पालकांची नजर चुकवून शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालय सुटल्याबरोबर ही मुले थेट नेहमीच्या टपऱ्या वा नेहमीचे पानशॉप गाठत आहेत.दररोज महागड्या सिगारेट खरेदी करून धूम्रपान करीत आहेत तसेच काही ठिकाणी हुक्का ओढत आहेत.
दुकानदारांना याचे काहीही वावडे नाही उलट आपला व्यवसाय वाढावा म्हणून अनेक ठिकाणी खास सोय करण्यात आली आहे.या ठिकानी हे धूम्रपान करणारी मुले व युवक धूम्रपान करोत असतात या अडयामधून हळूहळू गुन्हेगारीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.बहुतांश तरुण युवक मंडळी गांजा ची पुडी विकत घेऊन सिगारेट ची तंबाकू बाहेर काढून त्यात गांजा भरून सिगारेट व्यसन करीत आहेत.व्यसनाधीन झालेले हे तरुण मंडळी चुकीचा मार्गही स्वीकारत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जात आहे.सार्वजनिक धूम्रपान विरोधी कायदा हवेतच विरला जात आहे.कायद्याने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना आढळल्यास कारवाही होणे अपेक्षित आहे परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने हा कायदा केवळ कागदावरच राहिला आहे.प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कामठी शहरात बहुतांश पानटपऱ्यावर चालतो हुक्काबार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com