संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9:- कामठी नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थाचा एक भाग असून नागरीकाकडून मिळत असलेल्या विविध करातून नगर परिषद चा कारभार सुरू असतो .तेव्हा हा कारभार सुरळीत रहावा व नागरिकांनी योग्य वेळी कराचा भरणा करून एक जवाबदार नागरिक असल्याचे साध्य करावे असे समुपदेशन कामठी नगर परिषद च्या संबंधीत कर्मचाऱ्याने केल्याने कामठी शहरातील बहुतांश नागरिकांनी कराचा भरणा केला यानुसार कामठी नगर परिषद ने एका वर्षात मोठी विक्रमी वसुली केली असून या एक वर्षाच्या आर्थिक वर्षात एकूण 3 कोटी 80 लक्ष 62 हजार 368 रुपयांची विक्रमी कर वसुली करण्यात आली.यातील विशेष म्हणजे नगर परिषद कर्मचारी रुपेश जैस्वाल यांनी वर्षभरात 58 लक्ष 87 हजार 370 रुपयाची कर वसुली केली असून त्यातुन माहे मार्च महिन्यात 26 लक्ष 32 हजार 461 रुपयाची विक्रमी कर वसुली केली.ज्यामुळे रुपेश जैस्वाल यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
कामठी नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने 12 फेब्रुवारी पासून नगर परिषद मध्ये प्रशासक राज सुरू झाले यावेळी नगर परिषद चे प्रशासक एसडीओ श्याम मदनूरकर व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी सर्व विभाग प्रमुख तसेच कार्यालयिन अधिकारी कर्मचाऱ्यांना कर वसुली वर भर देण्याचे निर्देश दिले होते.दरम्यान वरिष्ठांनी केलेले आदेश व मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटचा महिना या दोन्ही बाबी गांभीर्याने लक्षात घेत संबंधित कर वसुली अधिकारी कर्मचाऱ्यांनो थकबाकीदार करधारकाकडे मोर्चा वळवून योग्य समुपदेशन सह ,प्रशासकीय वर्तन चा वापर करीत मोठ्या प्रमाणात विक्रमी वसुली केली.यानुसार एकूण 3 कोटी 80 लक्ष 62 हजार 368 रुपयाची विक्रमी वसुली केली.
कामठी नगर परिषद च्या मालमत्ता कराची वसुली थकबाकी 3 कोटी 85 लक्ष रुपये असून त्यामधून 2 कोटी 28 लक्ष 16 हजार 209 रुपयांची वसुली करण्यात आली तसेच जलकर विभागाच्या मोठ्या थकबाकीतून 1 कोटी सात लक्ष 27 हजार 431 रुपयांची वसुली करण्यात आली तसेच बाजार विभागाकडून 43 लक्ष 38 हजार 228 रुपयांची वसुली करण्यात आली.व बांधकाम विभागातर्फे 1 लक्ष 80 हजार 500 रुपयांची वसुली करण्यात आली.यानुसार कामठी नगर परिषद ने एका वर्षात 3 कोटी 80 लक्ष 62 हजार 368 रूपयाची विक्रमी वसुली करण्याचा गौरव प्राप्त केला.
ही यशस्वी कर वसुली प्रशासक एसडीओ श्याम मदनूरकर , मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनार्थ कर विभाग प्रमुख आबासाहेब मुळे, प्रदीप भोकरे, विजय सूर्यवंशी, गंगाधर मेहर, मसूद अख्तर, विकास धामती, दिपक जैस्वाल, अक्षीश मलिक, मंगेश खांडेकर, राकेश दमके, विशाल नारदलेवार,रवी गुप्तां, जलकर विभाग प्रमुख अवी चौधरी, संतोष मिश्रा, गणेश तलमले, चंद्रकांत शिवरकर, तसेच बाजार विभाग प्रमुख राहुल बोकारे, दीपक रेवतकर, तसेच बांधकाम विभाग प्रमुख मंगेश लाडे, संजय जैस्वाल, संजीव वाजपेयो यांनी केले.
कामठी नगर परिषदची विक्रमी वसुली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com