कामठी नगर विकास कृती समिती,कामठी च्या आमरण उपोषणाची सांगता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर शहराचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहराला दोन दोन आमदार लाभूनही कामठी शहर अजूनही मूलभूत सोयी सुविधांसह विकासापासून वंचीत आहे .तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य जनतेच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित व रखडलेल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी कामठी नगर वासियाच्या वतीने कामठी नगर विकास कृती समिती,कामठीने राजकुमार उर्फ सुगत रामटेके यांच्या नेतृत्वात कामठी तहसील कार्यालय समोर 12 ऑगस्ट पासून आमरण उपोषण पुकारले होते .यासंदर्भात जिल्हाधिकारी ने 28 ऑगस्ट च्या बैठकीत मागण्यांचे समस्त निराकरण करून देण्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषणाच्या 9 व्या दिवशी तहसीलदार गणेश जगदाडे यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, जितू गेडाम,संघपाल गौरखेडे,गणेश आगाशे,,मनोज धोटे,,राजन बागडे ,निखिल रामटेके जयपाल बरसागडे,आरजू कांबळे आदी उपस्थित होते.

आमरण उपोषण पुकारलेल्या मागण्यात जयस्तंभ चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची पुनर्रचना करून सौंदयीकरण करणे,भूमिगत गटार योजनेतील आर्थिक अनियमितता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी,कामठी शहरातून गिळंकृत केलेली औद्योगिक वसाहत (एमआयडीसी)ची पुनर्रचना करण्यात यावी,कामठी शहरातील खेळाडूंना मैदान उपलब्ध करून प्रस्तावित क्रीडा संकुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे,नवीन कामठी परिसरात नवीन बाजारपेठ राजश्री छत्रपती शाहू महाराज नावाने दर रविवारी आठवडी बाजार सुरू करण्यात यावा. नागपूर जिल्ह्याकरिता मंजूर वैद्यकिय महाविद्यालय कामठी शहरात प्रस्तावित करावा अथवा तेथे 500 खाटाचे अत्याधुनिक शासकोय रुग्णालय मंजूर करण्यात यावा,कामठी शहरातील विवादित शासकोय जमिनीवर शासन प्रशासन तर्फे बालोद्यान निर्माण करण्यात यावा.कामठी शहरातील लिज प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा व अतिक्रमनधारी नझुल धारकांना मालकी हक्क द्यावा,कामठी शहरातील विभिन्न सार्वजनिक ठिकाणी स्त्रीयाकरिता स्वतंत्र सार्वजनिक शौचालय तयार करण्यात यावे,कामठी शहरातील पत्रकारासाठी तालुका पत्रकार भवन व पेपर विक्रेत्याना बसण्याची सोय निर्माण करून द्यावी,शहरात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कालावंतासाठी सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात यावी,मुख्याधिकारी नगर परिषद कामठी यांना जयस्तंभ च्या विटंबना प्रकरणी निलंबित करण्यात यावे तसेच त्यांच्या संपत्तीची सुद्धा पडताळणी करण्यात यावी.या मागण्यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषदेला पारंपारिक व्यवसाय कुंभार, पेंटर, मूर्तिकार यांना नगर परिषद क्षेत्रात व्यवसायिक विक्री जागा मिळवून देण्याबाबत शिवसेना उबाठा तर्फे मुख्याधिकारी यांना मागणी नगर परिषदेला निवेदन

Thu Aug 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष, प्रतिनिधी  कामठी :- कामठी शहरातील व कामठी शहरालगत असलेल्या पारंपारिक मातीचे मूर्तिकार व कारागीर यांचा चरीतार्थ त्यांचे व्यवसायावरच अवलंबून असून अत्यंत परिश्रमाने घाम गाळून तयार केलेल्या मुर्त्या व अन्य सामग्री सजावटीचे सामान सणासुदीला व श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, लक्ष्मीपूजन या सर्व सणात आवश्यक असलेल्या पूजेच्या देवी-देवतांच्या तयार केलेल्या मुर्त्या,व अन्य साहित्य विक्री करिता नगर परिषदेने कोणत्याच प्रकारची व्यवस्था […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com