कामठी नगर परिषद निवडणूक ‘तारीख पे तारीख’

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात सुप्रीम कोर्टाने 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीत न्यायालयाने अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात असून मे महिन्यात प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील असे देखील बोलले जात आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या कामठी नगर परिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत तर या निवडणूक संदर्भात 25 फेब्रुवारी च्या न्यायालयीन सुनावणीत निवडणुकीचा मुहूर्त मिळेल असा आशावाद असला तरी निवडणूक बाबत तारीख पे तारीख मिळत असल्याने भावी नगरसेवक आर्थिकदृष्ट्या आता कमकुवत झाले असून कधी एकदाच्या कामठी नगर परिषदच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात याकडे माजी भावी नगरसेवकासह इच्छुक उमेदवाराच्या नजरा खिळल्या आहेत.

कामठी नगर परिषदचा पंचवार्षिक कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2022 ला संपला असून कामठी नगर परिषद च्या कारभारात प्रशासक राज सूरु आहे. 2017 ला निवडून आलेल्या कामठी नगर परिषद च्या निवडणुकीत थेट जनतेतून निवड करण्यात आलेल्या नगराध्यक्षपदी कांग्रेसचे मो शाहजहा शफाअत निवडून आले होते यासह कांग्रेस पक्षाचे 16 सदस्य निवडून आले होते.भाजप चे 8,बरीएमचे 2,बसपा 1 ,एमआयएमआय एम 1, अपक्ष तीन असे 32 नगरसेवक सह तीन नामनिर्देशीत सदस्य होते. या नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ लोटून तीन वर्षेचा लोटत आला असून प्रशासक कारभार सुरू आहे मात्र निवडणुका लांबणीवर असल्याने मुदत संपलेले नगरसेवक हे अजूनही प्रभागात विद्यमान नगरसेवक सारखे वावरत असून आपली राजकीय पोळी शेकत आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटून किंवा राजकीय आरक्षणा शिवाय कामठी नगर परिषद ची निवडणूक होऊन कार्यकारी मंडळ कार्यरत होईल अशी अपेक्षा होती तर महाविकास आघाडीच्या सत्ता काळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेची सुरुवात ही करण्यात आली होती ज्यामध्ये प्रभाग रचना तयार करणे,आरक्षण निश्चित करण्यापर्यंतचा समावेश होता मात्र राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता कोसळून शिंदे फडणवीस सरकारचे गठन झाले .नगरपरिषद च्या प्रभाग रचना झाल्या असून एका प्रभागात वाढ करून 17 प्रभाग करण्यात आले ,त्याचे आरक्षण ही काढण्यात आले .नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत पुनःश्च महायुतीची सत्ता आली असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नावाची वर्णी लागली तेव्हा आगामी कामठी नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर तीच प्रभाग रचना कायम ठेवली जाईल का?याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे.

कामठी नगर परिषद च्या प्रशासक कारभाराला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे तर नगरसेवका अभावी शहरात नागरिकांना अनेक कामासाठी त्रास सहन करावा लागत आहे.नगर पालिकेकडून एखादा दाखला,नोंदणी परवाना, प्राथमिक सोयी सुविधांची कामे आदी कामासाठी नागरिकांना पालिकेच्या चकरा माराव्या लागत आहेत नगरसेवक कार्यरत नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याची वास्तुस्थिती आहे.निवडणुका लांबणीमुळे माजी व भावी नगरसेवकांचा सर्वसामान्य नागरिकांशी काही प्रमाणात दुरावाही वाढत असल्याचे दिसून येत आहे.तर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य मतदारांशी जवळीक साधणाऱ्या राजकीय नेत्यांचा खरा चेहरा ही सर्वसामान्य मतदारा समोर आलेला दिसत आहे. .

प्रशासकाची विक्रमी कारकीर्द – अजय कदम

– कामठी नगर परिषद निवडणूक लांवणीवर गेल्याने प्रशासकाची विक्रमी कारकीर्द घडली याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होताना दिसत आहे. नगरसेवक नसल्याने विकासकामांचा निधी पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही रस्ते ,नाल्या याव्यतिरिक्त अन्य कोणतेही विकासकामे पाहायला मिळत नाही त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था कामठी नगर परिषद निवडणूक लवकर व्हावी अशी मागणी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम सह जनता व भावी नगरसेवकांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Sat Feb 1 , 2025
यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याकरीता एकुण 461 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेकरीता 156 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. मॅक व्हेईकल प्रा.लि., […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!