– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 25 :- कामठी नगर परिषद च्या मागिल पंचवार्षिक काळात कामठी शहरात अतिक्रमण चा वेढा पसरला असून सत्ताधारी राजकीय आश्रयातून जागोजागी अतिक्रमण थाटून पक्के बांधकाम करण्यात आले इतकेच नव्हे तर त्या अतिक्रमित जागेवर कर लागू करून जागा नियमित करण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी सुद्धा करण्यात आली आहे.या अतिक्रमण कारी नागरिकांना स्थानिक प्रशासनाचा आशीर्वाद असल्याने दिलेल्या चिरीमिरीतून ‘तेरी भु चूप मेरी भी चूप’या विचारसरणीत शहरात जिकडे तिकडे अतिक्रमण वाढले आहे तेव्हा हे अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेणार तरी कोण?असा प्रश्न नागरिकाकडून केल्या जात आहेत.
अतिक्रमणाचा वनवा दिवसेंदिवस सारखा लांबत आहे. शहरातील महामार्गाच्या कडेला अतिक्रमण कारीनी बिनधास्त पणे दुकाने थाटून बसले आहेत तर शहरातील अनेक रस्त्यांचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहेत.जागेच्या मालकी हक्काचा कुठलाही पुरावा नसतानाही अतिक्रमण करीत आहेत.12 फेब्रुवारी पासून नगर परिषद मध्ये प्रशासक राज सुरू झाल्याने आता कुठलंही राजकीय हस्तक्षेप राहणार नसल्याने प्रशासक श्याम मदनूरकर यांनी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना हाताशी धरून अतिक्रमण पथक निर्माण करून शहरातील अवाढव्य अतिक्रमण बाहेर काढून अतिक्रमण मोहीम राबवावी व अतिक्रमन काढलेल्या जागेवर नगर परिषद प्रशासनाने त्वरित कबजा करीत पुढचे नियोजित विकासकामे करावी अशी मागणी जोर धरत आहे