कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन

कामठी – भारतीय घटनेचे शिल्पकार  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती तील सहकार महर्षी बाबासाहेब केदार मार्केट यार्ड येथील कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली याप्रसंगी अनिकेत शहाने आम्ही बाबासाहेबांच्या जीवनीवर प्रकाश टाकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व व्यापक नेते असून बहुजन समाजातील सुशिक्षित शोषित पीडित उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्य महान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानंतर आंबेडकरी विचाराची आस्था व निष्ठा असलेल्या व्यक्तीच्या संघटनेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा जन्म  आले असून बाबासाहेबांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमाला प्रामुख्याने उपसभापती कुणाल पाटील इटकेलवार कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आमदारांच्या दिव्याखाली अंधार; अन दुसऱ्याला द्यायला निघाले "फाईव्ह स्टार"

Mon Dec 6 , 2021
यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अवमान   चंद्रपूर : ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय जर बघायचा असेल तर चंद्रपूरच्या स्थानिक आमदाराचे कार्यकर्तृत्व बघा. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर गालबोट लावून सुपर प्रसिद्धीसाठी आंदोलनाचे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळे मनपाच्या कामावर घोटाळ्याच्या आरोप लावताना आधी आपल्या “दिव्याखालचा अंधार” बघा आणि मगच दुसऱ्याला “फाईव्ह स्टार” देण्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com