संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी तालुक्यातील सात रिक्त कोतवाल पदाची भरती
कामठी :- कामठी तालुक्यातील सात तलाठी साझ्याचे कोतवाल पद रिक्त असल्याने या रिक्त कोतवाल पदाची भरतीची लेखी परीक्षा ही 11 जुलै ला घेण्यात येणार असून त्याच दिवशी अंतिम निकाल लागणार असून यानुसार पदभरती होणार आहे .या पदभर्तीसाठी चौथी पास उमेदवारही कोतवाल पदासाठी पात्र आहे.तरी कामठी तहसील अंतर्गत ‘कोतवाल’ पदाकरिता इच्छुक स्थानिक नागरिकांकडून अर्ज मागविन्यात येत आहेत.तरी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटो सहित अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहित 22 जून 2023 च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत कामठी तहसील कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने सादर करावेत.22 जून 2023 नंतर आलेला व अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली.
कामठी तालुक्यातील कोतवाल संवर्ग सरळसेवा भरती 2023 नुसार कामठी तालुक्यातील सात साझ्यात सात कोतवाल पद रिक्त आहेत याबाबत जाहीर आरक्षण नुसार कामठी तालुक्यातील येरखेडा गावातील साझा क्र 16 येरखेडा येथे कोतवाल पदासाठी 1 जागा रिक्त असून ही जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.भिलगाव साझा क्र 15 मध्ये भिलगाव व खसाळा या दोन गावाचा समावेश होत असून रिक्त 1 जागेच्या कोतवाल पदासाठी ही जागा अनुसूचित जाती (महिला)पदासाठी आरक्षित आहे.साझा क्र 26 अ ,केसोरी मध्ये केसोरी , भामेवाडा,आसलवाडा व जाखेगाव या चार गावाचा समावेश असून या साझ्यातील रिक्त 1 जागेच्या कोतवाल पदासाठी ही जागा भटक्या जमाती(क)प्रवर्गासाठी राखीव आहे.साझा क्र 32 आडका मध्ये आडका,टेमसना, परसोडी,कुसुम्बी या चार गावाचा समावेश होत असून रिक्त 1 जागेसाठी हे पद भटक्या जमाती (ड)प्रवर्गासाठी आरक्षित आहे.साझा क्र 28 भुगाव मध्ये भुगाव व मांगली या दोन गावाचा समावेश होत असून रिक्त 1 जागेच्या कोतवाल पदासाठी ही जागा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी आरक्षित आहे.साझा क्र 19 आजनीत आजनी व गादा या दोन गावाचा समावेश होत असून रिक्त 1 जागेच्या कोतवाल पदासाठी ही जागा खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.साझा क्र 20 महालगाव मध्ये महालगाव व कढोली या दोन गावाचा समावेश होत असून येथील रिक्त 1 जागेसाठी हे पद खुला प्रवर्ग (महिला)साठी आरक्षित आहे.
उपरोक्त नमूद प्रवर्गातील कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
रिक्त 8 कोतवाल पदासाठी 9 जून 2023 ते 22 जून 2023 च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील,23 जून 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.3 जुलै 2023 ते 7 जुलै 2023 पर्यंत पात्र उमेदवारांना परिक्षेकरिता प्रवेशपत्र देण्यात येतील या कोतवाल पदाची भरती करिता 11 जुलै ला सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत लेखी परीक्षा घेण्यात येईल व त्याच दिवशी 11 जुलै ला अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.
-उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चौथी पास असावे व उमेदवाराचे वय जाहिरनाम्याच्या दिनांकाला कमीत कमी 40 वर्षे या वयोगटातील असावे.