कल्पना साबळे ‘मिसेस महाराष्ट्र क्लासिक’

गुरुग्राम येथील ‘मिसेस इंडिया ऑन इन अ मिलियन’ स्पर्धेत गौरव

नागपूर : हरियाणातील गुरुग्राम येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस इंडिया वन इन अ मिलियन ब्युटी पिजंट स्पर्धेत नागपुरातील कल्पना साबळे यांना ‘मिसेस महाराष्ट्र क्लासिक’ हा किताब प्राप्त झाला.

गुरुग्राम येथील हॉटेल क्राऊन प्लाझा येथे आयोजित अंतिम स्पर्धेत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सदर स्पर्धेत संपूर्ण भारतातून 70 स्पर्धक सहभागी झाले होते. वर्षभर चाललेल्या निवड चाचणीच्या विविध टप्प्यातून या स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. कल्पना साबळे स्पर्धेतील संपूर्ण टप्पे पार करत अंतिम फेरीत ‘मिसेस महाराष्ट्र क्लासिक’ हा मानाचा मुकुट पटकाविला. या पुरस्कारांसह ‘बेस्ट नॅशनल कॉस्टयूम’ अर्थात उत्कृष्ट राष्ट्रीय पेहराव आणि ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत नंदकिशोर साबळे यांच्या त्या पत्नी होत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्युत कर्मचाऱ्यांचे आंदोलन नागपूर बसपाचा पाठिंबा 

Thu Jan 5 , 2023
नागपूर :-महाराष्ट्र सरकारने विद्युत विभाग अडाणीला विकण्याचा करार करण्याच्या विरोधात संपूर्ण राज्यभर वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने समर्थन देण्यात आले. नागपुरातील संविधान चौकात आज झालेल्या वीज कर्मचारी आंदोलनात प्रत्यक्ष हजेरी लावून नागपूर जिल्हा बसपाचे उपाध्यक्ष अमित सिंग यांनी जाहीर समर्थन दिले व यावेळी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. बसपा नेते उत्तम शेवडे यांनी शासनाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com