नागपूर :- दिनांक ०६/०२/२०२३ रोजी औषध निरीक्षक नितीन पद्माकर भांडारकर हे अन्न व औषधी प्रशासन विभाग नागपुर यांनी ग्रामीण रूग्णालय कळमेश्वर येथे मेडीसीन पडताळणी करीता भेट दिली असता त्यांना Recip-500 Tablets, B.No. LC-44, Mfg dt. 10/2022, Exp. Dt. 09/2024, Mfd. by M/s. Refant Pharma Pvt. Ltd., Plot No. L-89, MIDC, Kerala-364135 ही औषध बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी सदर औषधीना नमूना जप्त करून वैद्यनिक प्रयोगशाळा, मुंबई येथे चाचनी करीता पाठविला असता सदरची औषध ही बनावट असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्याने तसेच कोणत्याही औषधीचे निर्माती व पुरवठा करण्यासाठी आवश्यक व अतिमहत्त्वाचे असणारे खोटे सी. ओ. ए. व जि.एम.पी. प्रमाणपत्र सादर करून त्याद्वारे शासनाकडुन ई टेन्डरीग मिळवुन शासनाला Recip-500 Tablets या बनावट औषधीचा पुरवठा केला असल्याने आरोपोंविरूध्द पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे अप क्र. ५७/२०२४ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७५, २७६, ३४ भादवि प्रमाणे नोंद असुन तपासात आहे.
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी विजय शैलेद्र चौधरी मालक रा. फ्लॅट नं. १९०७, बिल्डींग नं. ०८ पुनम क्लस्टर २. शांतीनगर, मिरा रोड ठाणे याने अटकपूर्व जामीनाकरिता मा. जिल्हा व सत्र न्यायालय नागपुर तसेच मा. उच्य न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथे अर्ज दाखल केलेला होता. गुन्हयाचे तपासी अधिकारी अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांनी तसेच त्याचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजुर होवु नये याकरिता मा. न्यायालयामध्ये सरकारतर्फे बाजू मांडुन आरोपीचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज नामंजुर करून घेतला व नंतर गुन्हयातील आरोपीची शोधकामी मीरा भाईंदर ठाणे येथे जावुन गुन्हयातील मुख्य आरोपी विजय शैलेद्र चौधरी मालक रा. फ्लॅट नं. १९०७. बिल्डींग नं. ०८ पुनम क्लस्टर २. शांतीनगर, मिरा रोड ठाणे यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आनुन गुन्हयात कायदेशिर अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात अनिल म्हस्के (भा पो.से.) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, पोउपनि दत्तात्रय कोलटे, पोशि मनिष सोनोने, पोशि नितेश पुसाम यांनी केलेली आहे.