कळमेश्वर पोलीसाची कार्यवाही मोटार सायकल चोरा कडून एकूण ०९ मोटार सायकली जप्ती

कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपी १) तेजस अबर रामावत वय २२ वर्ष रा. ब्राम्हणी बायपास रोड कळमेश्वर २) विक्की उर्फ खुटी रामकृष्ण भलावी वय १८ वर्ष रा. येरला ता. जि. नागपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता पोलीसांना त्यांच्या कडुन पोलीस स्टेशन कळमेश्वरची ०१ मोटरसायकल, ०२ पाण्याच्या मोटार पंप, नागपूर शहर ह‌द्दीतील पोलीस स्टेशन बजाज नगर ०१ मोटरसायकल, सिताबर्डी-०१ मोटरसायकल, गिट्टीखदान-०४ मोटरसायकल, हुडकेश्वर-०१ मोटरसायकल, नागपुर शहर व सेलु-०१ मोटरसायकल जि. वर्धा हददीतुन बोरी केलेल्या एकुण ०९ मोटार सायकल व ०२ पाण्याच्या मोटार पंप पोलीसांनी जप्त केल्या असून त्यामध्ये १) एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्पेडर प्लस मोटार सायकल क. MH40/CP2636 ज्याचा इंजीन क. HA11EAN5M55590 चेचिस नंबर MBLHAW179N5MO5377 २) एक काळया रंगाची होन्डा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल क. नबर प्लेट नसलेली जिचा चेचिस नंबर NE4KC09CCD8517516 इंजीन क. KC09E-8- 6526813 ३) एक काळया रंगाची होन्डा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल क. नवर प्लेट नसलेली जिया चेविस नंबर NE4KC093C98054031 इंजीन क. KC09E-10-105589 ४) एक काळया रंगाची होन्डा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल क. नंबर प्लेट नसलेली जिचा चेचिस नंबर ME4KC3156K8003849 इंजीन क. KC31E82003958 5) हिरो होंडा सी वी शाईन मोटार सायकल क. MH40/S6825 6) हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क. MH31/BA85947) एक काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर नंबर प्लेट नसलेली चेचिस नंबर 05F16C37702 इंजीन क. 058F15M375128) एक हिरो कपंनीची प्लेझर मोपेट मोटर सायकल इंजिन क्र. JF16EBBGL164019) एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल क. MH49/AN5388 व दोन पाण्याच्या मोटारपंप किंमती ५००० रू. असे पोलीस स्टेशन कळमेश्वर हददीतील ०२ व इतर पोलीस स्टेशन हददीतील ०८ गुन्हे उघड करण्यात आले आहे. सदर गुन्हात एकुण ५,८०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी कडुन आणखी चोरी केलेल्या मोटार सायकल हस्तगत करण्याचे शक्यता असुन गुन्हाचा तपास चालु आहे. आरोपीतांना दि. २१/०९/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के (भा.पो.से), यांच्या मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, स.फौ. सुनिल मिश्रा, स.फौ. मन्नान नौरंगाबादे, पो.हवा. दिनेश गाडगे, पोशि. विवेक गाडगे, पो.शि. हेमंत बांबुळकर यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगारांना मुद्देमालासह रंगेहात पकडून गुन्हा उघड

Wed Sep 25 , 2024
– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही नागपूर :- नागपूर जिल्हा ग्रामीण उपविभाग सावनेर हद्दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात परफोडी व्या संदर्भात दाखल गुन्हयाचे समांतर तपास करण्याचे आदेश दिले, त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्त्याखाली अधिकारी व अंमलदारांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com