संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 18 – अश्विन शुद्ध चतुर्दशी कोजागिरी पोर्नोमेनंतर दुसऱ्या दिवशी पासून कार्तिक मासाला सुरूवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्तिक मासाला प्रारंभ होताच कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात काकड आरतीला सुरुवात झाली आहे तर पहाटेच्या प्रहारी मंदिरातील घंटारव आणि काकड आरतीचे स्वर गुंजायला लागले आहेत .
हिवाळ्यात भागवत सप्ताह, काकड आरती अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यामध्ये अध्यात्मिक संस्कार पुढच्या पिढीकडे रुजले जावे आणि संस्कृती परंपरे नुसार चालत आलेल्या भागवत धर्मची पताका कायम परंपरागत पद्धतीने सुरळीत शिरावर धरली जावी हा त्या मागचा उद्देश असतो .हिवाळ्यात आल्हाददायी वातावरण असते, पहाटेच्या वातावरणात आक्सिजनचे प्रमाण अधिक असते या वातावरणामुळे मानवाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते त्यामुळे पहाटे पाच वाजताच्या सुमारास काकड आरतीची गुंज कानावर येते .भक्तगण पहाटेच घरचे कामे आटोपून आंघोळ करून मंदिरात गोळा होतात आणि काकड आरतीचा मंजुळ स्वर गाजतात. आजच्या धकाधकीच्या युगात एकतर अध्यात्मिक कडे युवकांचा कल वाढावा या उद्देशाने तालुक्यात कोजागिरी पोर्णिमे नंतर जपली जाणारी काकड आरतीची परंपरा यावर्षीही कायम आहे.तर कामठी येथील दुर्गादेवी नगर स्थित हनुमान मंदिरात भल्या पहाटे काकड आरतीचा स्वर गुंजतोय.
या काकड आरतीत काशिनाथ प्रधान,नरेंद्र सार्वे ,मोहन मते, पलाश मेरखेड, तुषार बोंबेट ,कार्तिक बोंबाटे, आदित्य उपासे, वंश ठाकरे ,प्रवीण सारवे, ओजस प्रधान, गौरव बगड़ते, रोहित मते, रोहित ठवकर, दुर्गेश परलेवार,दक्ष राऊत ,विनोद काटकर आदींचा सहभाग असतो.