संतूर तर्फे नैसर्गिक गुणांनी युक्त अशा नवीन लक्झरीयस शॉवर जेलच्या शृंखलेची सुरुवात

नागपूर :- संतूर, विप्रो कंझ्युमर केअर आणि लाइटिंगच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या टॉयलेट सोप ब्रँडने सेन्सेशनल शॉवर जेलची नवीन श्रेणी सुरुवात केली आहे. या नवीन श्रेणी मुळे ब्रॅन्डचा आता शॉवर जेल विभागात प्रवेश झाला असून यामुळे संतूरच्या महत्त्वपूर्ण प्रस्तूतीचे सार असलेल्या ‘फीलिंग यंग लाईक यस्टर्डे, एवरीडे या घोषवाक्याचा समावेश अधिक बळकट झाला आहे.

अतिशय अचूक अभ्यास आणि काळजीपूर्वकतेने तयार करण्यात आलेल्या संतूर शॉवर जेल मध्ये तीन अनोखे प्रकार असून प्रत्येक प्रकाराची निर्मिती ही संवेदनशीलता आणि त्वचेच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. संतूरच्या नैसर्गिक गूणांवर लक्ष देण्याची आपली वचनबध्दता जपून प्रत्येक प्रकारात दोन नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला असून यांत ओलाव्यासाठी चंदन आणि गार्डेनिया, त्वचेला ताजेतवाने करण्यासाठी लिंबू आणि चाफा, त्वचेला चमक आणण्यासाठी सॅफ्रॉन (केशर) आणि मॅरिगोल्ड यांचा उपयोग करण्यात आला आहे.

या सुरुवाती विषयी आपला उत्साह व्यक्त करतांना विप्रो कन्झ्युमर केअर ॲन्ड लायटिंग चे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री एस प्रसन्न राय यांनी सांगितले “ शॉवर जेल विभागात प्रवेश करतांना आम्ही संतूरची स्थापना धोरणात्मक रित्या सर्वसमावेशक आणि संवेदनशील अनुभव म्हणून करत आहोत. चंदन, लिंबू आणि केशरासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करुन आम्ही त्वचेच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याबरोबरच आमच्या ग्राहकांचा फिल गुड अनुभवही समृध्द करत आहोत. सातत्याने बदलणार्‍या बाजारपेठेत आम्ही संतूरच्या परंपरेला नवीन जोड देऊन वैयक्तिक निगा क्षेत्रातही आमचा ठसा उमटवून आमच्या ब्रॅन्डचे सारही कायम राखत आहोत. ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा लक्षात घेऊन हे प्रकार तयार करण्यात आले असून यामुळे ग्राहकांना वैयक्तिक असा आंघोळीचा समृध्द अनुभव आम्ही देऊ करत आहोत.”

संतूरच्या शॉवर जेलची श्रेणी ही दोन सोप्या आकारात म्हणजेच २५० मिली आणि ५००मिलीच्या आकारात अनुक्रमे रु १३५/- आणि रु ३५०/- या किंमतीत उपलब्ध असतील. ही उत्पादने प्रथमत: स्टॅन्डअलोन स्टोअर्स मध्ये येऊन ग्राहकांना उपलब्ध होतील व त्यानंतर ही उत्पादन मॉडर्न ट्रेड आऊटलेट्स आणि ई-कॉमर्स मंचांवरही उपलब्ध होतील.

संतूरने नेहमीच गुणत्तेची वचनबध्दता दर्शवून त्याच बरोबर ब्रॅन्डची आरोग्यपूर्ण आणि तरुण त्वचा देण्याची परंपरा सुरुच ठेऊन ग्राहकाभिमुखता सुध्दा जपली आहे. शॉवर जेल ची ही श्रेणी म्हणजे संतूरच्या ग्राहकांच्या सर्वसमावेशक कल्याणाला समृध्द करण्याचे द्योतक आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

Wed Feb 28 , 2024
– उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले स्वागत मुंबई :- माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल,मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यांसारख्या नेत्यांमुळे भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights