काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष, राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाल्याने लाडू वाटप

नागपूर :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना आज पुन्हा एकदा खासदारकी बहाल केली.

खरंतर आजचा दिवस केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकांसाठी उत्सवाचा आणि आनंदाचा क्षण आहे. कपट कारस्थान करून खासदारकी रद्द करणाऱ्या शक्तींना, महाशक्तिना सणसणीत चपराक आहे. त्यामुळे असत्यावर मात करत आज सत्याचा विजय झाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा हा विजय जनतेचा भविष्यकाळ उज्ज्वल करेल अशी आशा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेला प्रेमाचा संदेश देश भर गुंजेल आणि नक्कीच परिवर्तन घडेल असे यावेळी पांडव यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ब्लॉक काँग्रेस कमेटी 4/5/6 चे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन एस यु आय, सेवादल चे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्पदंश मृतकाला 50 लाखाची मदत मिळावी : बसपा ची मागणी

Mon Aug 7 , 2023
नागपूर :- घरात झोपून असलेल्या वीस वर्षीय सुशिक्षित आदिवासी तरुणी मयुरी विजय धुर्वे हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या परिवाराला शासनाने व वन विभागाने नुकसान भरपाई पोटी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा धिकारी व वन विभागाकडे केली आहे. 27 जुलै रोजी हिंगणा तालुक्याच्या नेरी मानकर गावातील कृषीचे शिक्षण घेणारी मयुरी ही महाविद्यालयीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com