सेंट्रल एव्हेन्यू, कामठी मार्गावर आनंदाचे वातावरण , मेट्रो ट्रेनचे विविध संघटनांनी केले स्वागत

नागपूर :- महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावरील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. खापरी मेट्रो स्थानकावर पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने उदघाटन करताच, नवीन सजवलेली मेट्रो ट्रेन सेंट्रल एव्हेन्यूच्या प्रजापती नगर मेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना घेऊन सीताबर्डी इंटरचेंजकडे रवाना झाली.

प्रजापति नगर, वैष्णो देवी चौक, आंबेडकर चौक, टेलीफोन एक्सचेंज चौक, चितार ओली, अग्रसेन चौक, दोसर वैश चौक स्थानकांवरून प्रवासी गाडीत बसले. मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींच्या छतावरून तेथील रहिवाश्यांनी फुलांची उधळण करून ट्रेनचे स्वागत केले. तसेच खापरीहून निघालेल्या गाडीने ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत पहिला प्रवास केला. गड्डीगोदाम, कडबी चौक, नारी स्टेशनचे येथील प्रवासी देखील मेट्रो गाडीत दाखल झाले. ट्रेनच्या आगमनावेळी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.• दोन्ही मार्गिकांवर आनंदाचे वातावरण

सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. चितार ओळी चौकात मारबत उत्सव समितीतर्फे मारबते चे दृश्य साकारलेल्या मेट्रो खांबाला फुलांनी सजवण्यात आले होते. समितीच्या अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्मवर ट्रेनचे स्वागत केले. अग्रेसन चौक येथे नागपुर चेंबर ऑफ कॉमर्स लिमिटेड, अग्रवाल समाज, दोसर वैश्य समाज, आंबेडकर चौक मित्र मंडल, जगत पब्लिक स्कूल सहकार मंच, पुलक मंच परिवार, समर्पण सेवा समिति, प्रयास ग्रीन सिटी, लायन्स क्लब, पूर्व वर्धमान नगर संस्कृति क्रीड़ा मंडल, पुरवा फाउंडेशन, क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, स्वामीनाराण स्कूल, स्वराज पब्लिक स्कूल, वैष्णोदेवी चौक मित्र मंडल, बजरिया नागरिक मंडल, माँ भवानी चेरिटेबल हॉस्पिटल आणि ऑटोमोटिव मार्गिकेवर गड्डीगोदाम व्यापारी संगठन, गोलबाज़ार व्यापारी संगठन, शीतला माता मंदिर क्रीड़ा मंडळ आणि इतर संगठनांच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. महामेट्रो तर्फे दोन्ही मार्गावरील स्थानकांवर टीव्ही स्क्रीन लावण्यात आलेत. झिरो माईल आणि खापरी स्टेशनवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांनी स्टेशनवरच पाहिले. पंतप्रधानांनी गाडीला डिजिटल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवताच, त्या क्षेत्रातील रहिवासी पहिली मेट्रो राईड घेण्याकरिता आनंदाने प्लॅटफॉर्म कडे रवाना झाले.

पहिला प्रवासी होण्याचा निखळ आनंद… मनोज यावलकर 

प्रजापतीनगर स्टेशनवरून प्रवास करताना पहिल्या मेट्रो ट्रेनमध्ये जाताना आपल्याला अतीव आनंद होत असल्याचे मनोज यावलकर यांनी सांगितले. लोकमान्यनगरप र्यंतच्या प्रवासाचे पहिले तिकीट मी घेतले आहे. प्रवासी सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या ट्रेनचे पहिले तिकीट काढून मी प्रवास करत आहे याचा आज मला अभिमान वाटतो. त्रिमूर्ती नगर येथील रहिवासी असलेले पहिले प्रवासी मनोज यावलकर यांचे मेट्रो परिवाराच्या वतीने पुष्प देत स्वागत करण्यात आले.माझा संकल्प पूर्ण झाला आहे: यादवनगर येथील रहिवासी कामिनी सिंह यांनी ऑटोमोटिव्ह स्टेशनवरून प्रवास करताना सर्वांच्या आधी तिकीट खरेदी केले.

मेट्रो सेवा सुरु झाली की त्या मार्गिकेवर प्रवास करताना आपण पहिले तिकीट घेत मेट्रो गाडीत प्रवास करण्याचा आपण संकल्प केला होता असे श्रीमती कामिनी सिंह यांनी सांगितले. संकल्प पूर्ण झाल्याचा आपल्याला खूप आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोचा प्रवास महिलांसाठी सर्वात सुरक्षित असल्याचे देखील त्या म्हणाल्यात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि के कामठी उपक्षेत्र में सुरक्षाकर्मी पर दागी गोलियां , अभी भी हालत गंभीर

Tue Dec 13 , 2022
आरोपी को कामठी न्यायालय में पेश किया गया न्यायधीश ने 15 तारीख तक पीसीआर दिया गया । कन्हान :- दिनाक 11 दिसंबर रविवार दुपहर करीबन 4:30 बजे वेकोलि के कामठी उपक्षेत्र में ड्यूटी पर तैनात सुरक्षा गार्ड को गोली मार दी गई . पुलिस ने आरोपी समीर सदरुल सिद्दीकी ( खदान नंबर -4 ) और उसके साथी राहुल जैकब को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com