– डिजिटल सुरक्षितता आणि दक्षता यांची संस्कृती जोपासण्यासाठी स्वीकारलेला हा संपूर्णतः सरकार दृष्टीकोन आहे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू
– आम्ही अधिक निर्धोक, अधिक सुरक्षित आणि लवचिक डिजिटल भारताची संकल्पना साकार करणारी चळवळ उभारत आहोत: संजय जाजू
नवी दिल्ली :- येथे आज “स्कॅम से बचो” म्हणजेच “घोटाळ्यांपासून सावध राहा” या राष्ट्रीय जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांचे बीजभाषण झाले.
ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढत्या प्रकरणांचा सामना करून सायबर सुरक्षिततेत वाढ करण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेला अनुसरून, घोटाळे आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या धोक्याशी लढा देणे हा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय), केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय (एमएचए), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय सायबर गुन्हेविषयक समन्वय केंद्र (आय4सी) यांच्या सहयोगासह मेटाने सुरु केलेल्या या उपक्रमाचा उद्देश आहे.
मेटाच्या ‘स्कॅम से बचो’ या अभियानाला पाठींबा व्यक्त करताना संजय जाजू यांनी यावेळी ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्यापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दिशेने उचललेले हे योग्य वेळी उचललेले अत्यंत आवश्यक पाऊल आहे असे नमूद केले. या उपक्रमातून डिजिटल सुरक्षितता आणि दक्षता यांची संस्कृती जोपासण्यासाठी स्वीकारलेला संपूर्णतः सरकार दृष्टीकोन दिसून येतो असे ते म्हणाले.
तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे भारताला सायबर सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत आहे
भारतात सुमारे 900 दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असलेल्या भारतातील डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत असाधारण डिजिटल वाढ झाली आहे, त्यामुळे UPI व्यवहारांमध्ये भारत जागतिक आघाडीवर आहे,असे या कार्यक्रमादरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान सचिवांनी अधोरेखित केले.
तथापि, या प्रगतीसोबतच वाढत्या सायबर फसवणुकीमधेही वाढ होते. 2023 मध्ये यासंदर्भात 1.1 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी या धोक्यांचा सामना करण्यासाठी आणि डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी मजबूत उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
घोटाळ्यांपासून सावध राहा: नागरिकांचा सायबर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांना सिध्द करणे
“घोटाळ्यांपासून सावध राहा” ही मोहीम केवळ एक जागरूकता मोहीम नाही. ही मोहीम एक राष्ट्रीय चळवळ होऊ शकते, जी भारतीय नागरिकांना या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी साधने आणि ज्ञानाने सक्षम करू शकते,यावर कार्यक्रमादरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान सचिवांनी भर दिला. डिजिटल सुरक्षितता आणि दक्षता घेण्याची संस्कृती निर्माण करणे हे आमचे ध्येय सुलभ परंतु शक्तिशाली आहे.”मेटाच्या जागतिक कौशल्याचा लाभ घेऊन, ही मोहीम प्रत्येक भारतीयाला सायबर धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम करेल, आमच्या डिजिटल प्रगतीला मजबूत डिजिटल सुरक्षेने जोडले असल्याचे सुनिश्चित करेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.