जोगेंद्रनाथ मंडल जयंती साजरी

नागपूर :- डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बंगाल मधून संविधान सभेत निवडून पाठवण्याचे महान कार्य करणारे महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांची 119 वी जयंती आज दक्षिण नागपुरातील मान्यवर कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयात बसपा नेते उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करुन साजरी करण्यात आली.

जोगेंद्रनाथ मंडल यांच्या विषयी बोलताना उत्तम शेवडे यांनी सांगितले की जोगेंद्रनाथ मंडल यांच्या पुढाकारानेच बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ शकले. अन्यथा काँग्रेसच्या गांधी व नेहरूंनी बाबासाहेबांना संविधान सभेत जाण्यापासून जाणीवपूर्वक रोखले होते. परंतु जोगेंद्रनाथ मंडल व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने बाबासाहेब संविधान सभेत पोहोचल्याचा बदला म्हणून त्यांचा मतदारसंघच पाकिस्तानच्या स्वाधीन केला होता. परिणामतः बाबासाहेबांचे सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांना मुंबईतून प्रतिनिधित्व करावे लागले होते हे विशेष.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश ढेंगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ सोनटक्के यांनी तर समारोप विनोद सहाकाटे यांनी केला.

कार्यक्रमाला प्रा जगदीश गेडाम, चंद्रकांत कांबळे, श्यामराव तिरपुडे , संभाजी लोखंडे, कुणाल शेवडे, प्रथमेश डवले, रेहान खान, आदर्श शेवडे, आर्शी घोडेस्वार, आफिया मोहम्मद, आयरा मोहम्मद, अणेशा घोडेस्वार, रुई शहारे, आस्था शेवडे आदी प्रामुख्याने उपस्थित हो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 " रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन " उत्साहात संपन्न , ८० युवक युवतींचा सहभाग

Tue Jan 31 , 2023
चंद्रपूर  :- चंद्रपूर महानगरपालिका, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग ) व ॲथलेटिक्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत ” रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन ” स्पर्धा ३० जानेवारी रोजी पार पडली. सकाळी ६.३० वाजता गांधी चौक येथुन सुरु झालेल्या स्पर्धेत मुलींच्या गटातुन प्रथम बक्षीस आचल रमेश कडुकार, द्वितीय गौरी मधुकर नन्नावरे, तृतीय बक्षीस अभिलाषा संजीव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!