– शरद पवारांना 40 वर्षानंतर रायगड वारीचा योग आर्श्चयकारक
– ‘मविआ’कडून मराठा समाजाची दिक्षाभूल करण्याचे षडयंत्र
मुंबई/नागपुर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंकडून होणारी टिका ही दिलेल्या स्क्रीप्ट प्रमाणे होत असल्याचे दिसत आहे. फडणवीस साहेबांची जात काढून त्यांना बदनाम करण्याची सुपारी सध्या जरांगेनी घेतली असून त्यांनी लावलेले गंभीर आरोपातून तुतारीचा आवाज येत आहे. असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला. दुसरीकडे मराठे नेते म्हणून आजपर्यंत अनेक सत्ता भोगून आलेले शरद पवार यांना 40 वर्षांनंतर रायगडावर जाण्यासाठी लागला हे आर्श्चय आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांना कधीच छत्रपतींना अभिवादन करण्याचा योग आला नाही. आता राजकारणातून मिळणारे अपयश पाहून त्यांनी रायगडाची वारी करण्याचे धाडस केले. एका चित्रपटाची स्क्रीनींग करण्याचे काम त्यांनी त्याठिकाणी करून आपली तुतारी वाजविली. या तुतारीच्या जोरोवर आज जरांगेंनी स्वतांच्या जिवाला धोका आहे आणि मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याचे बिनबुडाचे आरोप केले. महायुती सरकारला केवळ बदनाम करण्याचे काम जरांगे करत आहे. त्यांनी मराठा समाजाची दिक्षाभूल करू नये असा इशाराही जयदीप कवाडे यांनी दिला.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आरक्षणात 10 टक्के वाटा देऊन पूर्ण केली. मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने दिलेल्या ऐतिहासिक निर्णय आहे. अशातच कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नसतांना जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नको ते आरोप करीत आहे. तसेच मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याची धमकी देणे यातून तुमचा मराठा समाजाची बदनामी करण्याचा दिसून येत आहे.
पुन्हा जातीचे राजकारण करू नका
न्यायलयीन मार्गातून आरक्षणाची लढाई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मार्गदर्शनात होत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांची जात काढण्याची अशोभनीय टिका करून केवळ मीच मराठा नेत्याचा बुराखा चढविण्याचे काम जरांगे करीत आहे. त्यांना दररोज एक स्क्रीप्ट देण्याचे काम तुतारी गटाकडून होत आहे. जरांगे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यावर टिका करण्यास टाळतात. एक ब्राम्हण समाजाचा उपमुख्यमंत्री असल्याने फडणवीसांवर आरोप करणे हे राजकारणाचे चाणक्य शरद पवार यांच्याच मार्गदर्शनातून होऊ शकते. जरांगेंनी आपल्या भाषा जपून वापरावी कारण मराठा समाज तुमच्या या कृतीला हळू हळू समजून घेत आहे. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन केवळ स्टंटबाजी आणि प्रकाश झोतात येण्याचे काम जरांगेनी करून नये, असा सल्लाही जयदीप कवाडे यांनी दिला. जरांगेंच्या आरोपाबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निषेध नोंदविण्यात आले आहे.