काटोल :- निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी व नागरिकांना पेयजल कृषी क्षेत्रात राज्यात पीकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, निसर्गाच्या लहरीपणामुळे अनिश्चित व खंडित पर्जन्यमान, यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या सर्व बाबींना विचारात घेऊन पाणी टंचाई या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार या अभियानाच्या टप्पा २ ची सुरुवात करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियान हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाकांक्षी असलेले जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा २ साठी काटोल उप विभागातील (१२५० ) गावांची निवड करण्यात आली. यापैकी( ३३) गावांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. या गावांमधील कामांची संख्या १२५९ एवढी आहे. यापैकी सर्वच (३३) गावांमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. काटोल उपविभागीय भागातील एकूण निवडण्यात आलेल्या गावाच्या संख्येशी सुरू करण्यात आलेल्या गावांच्या या अभियानातील कामे प्रगतिपथावरील कामांमध्ये काटोल तालुक्यातील (१९)गावांमधे७२५कामें तर नरखेड तालुक्यातील (१४) गावांत ५२५ कामे सुरू करण्यात आली आहेत.
काटोल उपविभागाचे नव नियुक्त उपविभागीय अधिकारी पडोळे यांनी १६जुन रोजी काटोल नरखेड तालुक्यांचा उपविभागीय स्तरावरील आढावा घेतल्यानंतर उपविभागीय स्तरीय जलयुक्त शिवार अभियानाला प्राधान्य क्रमाने राबविण्यात यावे व जलयुक्त शिवारची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानावर जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर,यांचे मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार संबंधीत काटोल उपविभातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचे आढावा बैठकीत कृषी , राजस्व, ग्राम विकास, जलसंपदा, सिंचन, भू जल संवर्धन या विभागांचे अधिकारी काटोल चे तहसीलदार राजू रणवीर, नरखेड तहसीलदार- डी डी जाधव, जलसंपदा- व्हि पी सोनवाने, पंचायत समिती नरखेड /काटोल बी डी ओ डॉ निलेश वानखेडे, दिपक गरूड, सचिन गोरटे, राजेंद्र जंवजाळ,आर जे चौधरी, व्हि डी भावरी, प्रशांत बावने, अश्विन कुरळकर,काटोल/नरखेड चे कृषी नायब तहसीलदार विजय डांगोरे, उपस्थित होते.