संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 29:- कामठी तालुक्यातील आजनी या छोटेखानी गावातील कामगार कवी लिलाधर दवंडे यांना नुकताच सन २०१९ चा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार कामगार कल्याण मंडळ मुंबई येथील हुतात्मा बाबू गेणू प्रांगणात कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री ओमप्रकाश कडू यांच्या हस्ते देण्यात आला.
कवी लिलाधर दवंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून कामठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालय चालवत असून सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी सत्कार यासारखे कार्यक्रम घेत असतात. याशिवाय विविध संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रात सुद्धा त्यांचे कार्य अलौकिक आहे. दवंडे हे बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीत नोकरीला असून नुकतेच त्यांच्या या यशाबद्दल गुरुवार दिनांक २८ एप्रिल रोजी जय बजरंग क्रीडा मंडळाच्या प्रांगणात त्यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. दवंडे हे एक उत्कृष्ट साहित्यिक असून त्यांची दोन काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय साहित्य स्पर्धांतून अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.
या प्रसंगी माजी आमदार देवराव रडके, सरपंच, सुनील मेश्राम, गजलकार ज्ञानेश्वर वांढरे, हेटे सर, लिलाधर वाणी, कवडू चींचुलकर, सुधाकर विघे, प्रफुल्ल घोडे , जय बजरंग क्रीडा मंडळाचे खेळाडू, नवयुवक युवा मंडळाचे कार्यकर्ते, आजनी येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल घोडे यांनी केले.
गुणवंत कामगार दवंडे यांचा जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com