नागपूर :-जिल्हा परिषद नागपूर मधून आलेल्या बातमीनुसार आशा वर्कर यांना अँड्रॉइड मोबाईल देऊन ऑनलाईन कामाची सक्ती करणे न्याय संगत नसून ऑनलाईन काम करण्याकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार मोबाईल खरेदी करून त्यावर दहा हजाराची किंमत लावून आशा वर्कर वर ऑन लाईन काम करण्याची सक्ती करीत आहे. बळजबरी करत मोबाईल देण्याचा प्रयत्न करीत आहेत आशा ही स्वयंसेविका आहे. २००७ पासून आशा योजना सुरू झाली तेव्हा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आशा स्वयंसेविकेची कामाच्या आधारावर मोबदलानुसार भरती करण्यात आली. त्यावेळेस शिक्षणाची कोणतीही अट नव्हती. दहावी नापास असलेल्या आशा वर्कर ऑनलाइन डाटा एन्ट्री कशा करणार ? सर्वात मोठी अडचण ग्रामीण क्षेत्रांमध्ये किंवा जंगल विभागांमध्ये आशा वर्कर ला येणार आहे. त्यांचा ठरलेला ॲप डाऊनलोड करणे, रजिस्टर मेंटेन करणे सोबतच नोंदणी मोबाईल मध्ये करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आशा ऑनलाइन कामांमध्ये व्यस्त राहील. तर नागरिकांच्या आरोग्याची काळजी केव्हा घेणार आशांचे असलेले काम आशा वेळेवर करू शकणार नाही. त्यामुळे आशांना मिळणारा कामाचा मोबदला सुद्धा त्यांना मिळू शकणार नाही. तर त्यांचा प्रपंच कसा चालणार? शासन जबरदस्ती मोबाईल खरेदी करून कोणाचे हित साध्य करीत आहे माहित नाही? परंतु आशा वर्करवर ऑनलाईन डाटा एन्ट्री ची सक्ती न करता ऑनलाईन काम करण्याकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी. अशी मागणी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यु) चे अध्यक्ष -काँ. राजेंद्र साठे यांनी आपल्या एका पत्रकातून केली.
आशा वर्कर ला अँड्रॉइड मोबाईल देऊन ऑनलाईन कामाची सक्ती करणे न्याय संगत नाही – कॉ.राजेंद्र साठे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com