संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतात त्यानुसार नगर परिषदमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड केली जाते मात्र ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा पंचवार्षिक कार्यकाळांतर पार पडत असले तरी ग्रामपंचायतमध्ये कधीच स्वीकृत सदस्यांची निवड केली जात नाही.तेव्हा ज्याप्रमाणे नगर परिषद स्तरावर स्वीकृत सदस्य घेतात त्याच तत्वावर प्रत्येक ग्रामपंचायतीला देखील त्यांच्या सदस्य संख्येनुसार स्वीकृत सदस्य घेण्याची परवानगी ग्रामविकास विभागाने द्यावी अशी मागणी रिपाई(गवई)चे नागपूर प्रदेश उपाध्यक्ष प्रा प्रमोद चहांदे यांनी केले आहे.
सामाजिक, विविध विकासात्मक विषयात विशेष तज्ञ असणारे लोकं अनेक वेळा राजकीय प्रवाहाच्या बाहेर राहतात .निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीत अशा तज्ञ लोकांची निवड प्रत्येक ग्रामपंचायतीला कायमची भासते अशा लोकांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाल्यास या लोकांचा अनुभव ग्रामपंचायत किंवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो त्यामुळे ग्रामपंचायतचा स्वीकृत सदस्य नेमण्याचा अधिकार जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला द्यावा.यासाठी ग्रामविकास विभागाने गंभीर्याने लक्ष पुरवावे.अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत स्तरावर गाव विकासासाठी होईल यात काहीच शंका नाही यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने असे ठराव जर मुख्यमंत्री व ग्रामविकास विभागाकडे पाठवले तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वीकृत सदस्य मिळेल अशी माहिती प्रा प्रमोद चहांदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन व्यक्त केले.