संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– न्यू खलाशी लाईन येथे गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार
कामठी :- जसे राजकीय घडामोडीत निवडणुकीत उमेदवाराला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर एक पाऊल पुढे टाकत पुढील निवडणूक जिंकण्याची प्रेरणा मिळते व मनोबल वाढते त्यानुसार परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यास त्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढत पुढील शिक्षणाची कास धरली जाते.व पुढील शिक्षणाची प्रेरणा मिळते त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करणे,विद्यार्थ्यांना प्रेरित करणे आणि त्यांच्या अभिरुचीच्या विकासात मदत करणे आणि त्यांच्या संस्कारातील नैतिक वाट पाडत शिक्षणाच्या सुवर्णसंदर्भात विद्यार्थ्यांचा सत्कार करणे गरजेचे असल्याचे मौलिक प्रतिपादन रामटेक लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी वीरांगना राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था कामठी च्या वतीने कामठी येथील न्यू खलाशी लाईन येथेआयोजित गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी व्यसपीठावर माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,संस्था संस्थापक मनीष गजभिये,संस्था अध्यक्ष रिता गजभिये,संस्था सचिव कुसूम खोब्रागडे,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,ऍड. डी सी चहांदे, डॉ राजेंद्र चौधरी, सुनील कांबळे, नरेंद्र वाघमारे,शिला मेश्राम,राजेश मेश्राम ,माजी नगरसेविका वैशाली मानवटकर,माजी नगरसेविका ममता कांबळे,विद्या भीमटे,राजेश कांबळे, धीरज यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेंळी गुणवन्त विद्यार्थी ,संस्थेचे पदाधिकारी ,सदस्य व परिसरातील नागरिक गण उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरांगना राजमता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था कामठी चे संस्थापक मनीष गजभिये,रिता गजभिये,कुसुम खोब्रागडे आदींनी मोलाची भूमिका साकारली.