ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर, फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटरला चालना देऊन, औषधनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देऊन एपीआय उद्योगाला आवश्यक त्या सुविधांना प्राधान्य देण्यासाठी उद्योग विभागाने पुढाकार घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेच्या पुढाकाराने ठाणे क्षेत्र विकासासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. यावेळी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

‘मित्रा’च्या माध्यमातून ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेतील विविध मुद्यांचा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. ठाणे, नवी मुंबई परिसरात आयटी व डेटा सेंटर वाढविण्यासाठी चालना देणे त्यासाठी एमआयडीसीमध्ये विशेष भुखंड निश्चित करून समर्पित डेटा सेंटर पार्क विकसीत करणे याविषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. उद्योग विभागाने यासंदर्भात डेटा सेंटर पार्कसाठी अधिसूचना काढण्याच्या कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

औषधनिर्मिती लागणारे एपीआय (ॲक्टिव्ह फार्मसिटीकल मॉलिक्युल) उद्योग ठाणे भागात मोठ्या प्रमाणावर असल्याने या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ड वर्ग उद्योगांसाठी लागू असलेल्या सवलती एपीआय उद्योगांना लागू कराव्यात, एमआडीसीने भुखंड द्यावेत आदी विषयांवर चर्चा झाली. एमएमआर क्षेत्रात ३० लाख नवीन घरांची निर्मिती यासंदर्भातही याबैठकीत चर्चा झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

Wed Feb 26 , 2025
– नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई :- नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  सन 2027 मध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!