ऑटो चालकाची गळफास लावून आत्महत्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या छत्रपती नगर रहिवासी तीन सीटर ऑटो चालकाने अज्ञात कारणावरून घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव आसिफ रजा वय 40 वर्षे रा.छत्रपती नगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सदर मृतक इसमाने कुठल्यातरी अज्ञात कारणावरून तीन दिवसांपूर्वी सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र घरमंडळींनी वेळीच मदतीची धाव घेतल्याने आत्महत्तेचा प्रयत्न टळला. मात्र आज घरमंडळीतील पत्नी व मुले हे काही कामानिमित्त घराबाहेर पडले असता घरी कुणी नसल्याची संधी साधून दोरीने गळफास लावून आत्महत्या करीत जीवनाचा शेवटचा निरोप घेतला.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com