मौदा :- येथील पोलीस स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोस्टे मौदा अंतर्गत मौजा डहाळी शिवार हिंडाल्को कंपनी समोर एक संशयितरीत्या वाहन उभे असलेले दिसून आले. यावरून स्टाफने सदर कारची पाहणी केली असता सदर मारोती स्विफ्ट कार क. एम.एच ४०/बी.एल ९७९१ चा चालक आरोपी नामे १) विशाल सुभाष बागडे वय २६ वर्ष, रा. स्नेहनगर मौदा व सोबत असलेला २) प्रितम इंदल सोनवने वय २५ वर्ष, रा. लापका रोड मौदा यांचे वाहनामध्ये अंदाजे १५० किलो वजनाच्या ०३ लोखंडी पडेट मिळून आले. सदर मुद्देमाला बाबत त्यांना विचारपुस केली असता उडवाउडविये उत्तरे दिली, अविक विचारपुस दरम्यान सदर लोखंडी प्लेटा या एन. टी. पी. सी मौदा येथुन चोरी करून आणल्याचे सांगितले. आरोपीतांकडुन १५० किलो वजनाच्या ०३ लोखंडी प्लेट किमती कि, १५००/-रु गुन्हयात वापरलेली कार मारोती स्विफट कार क. एम. एच ४० बी.एल ९७९१ किंमती ५,००,०००/- रु असा एकूण ५०१५००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार पोनि सतिशशसिंग राजपूत, पोउपनि महेश बोचले, पोहवा संदीप कडु, पोहवा रूपेश महादुले, पोना दीपक दरोडे, पो अं. अतिश यादवे, चालक जिवन देवांगन यांनी पार पाडली.