महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेंतर्गत प्रति लाभार्थी/प्रति प्रकरण देण्यात येणारी अनुदान रक्कम 10 हजारवरुन 50 हजार रुपये करण्यात आली आहे. या योजनेसाठी लाभार्थ्याकरिता उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मात्र ज्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे नमूद केलेले आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी या योजनेअंतर्गत अनुदानाची मर्यादा 10 हजारांवरुन जास्तीत जास्त 50 हजारांर्यंत करण्यात आलेली आहे.या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाचे mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. अर्जदाराने ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह (तीन प्रती) आपले कर्जाचे अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., गृहनिर्माण भवन, तळमजला रूम नं 35, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई-51 या ठिकाणी सादर करावेत.अर्ज स्वत:दाखल करणे आवश्यक आहे.त्रयस्थ तसेच मध्यस्थामार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जुलै महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

Sat Aug 3 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती काढल्या जातात. जुलै-२०२४ मध्ये दि. ०९/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. २०/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी, आषाढी विशेष, दि. १७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २४/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी आणि दि. २७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक(वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com