निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा- २०२३ भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा आयोगाकडून उपलब्ध

मुंबई :- निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात आला आहे.

या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क करावा असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष लेख :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण !

Thu Sep 26 , 2024
राज्यामध्ये पडीक जमिनीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. या पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण जनतेला रोजगार, उपजीविका, आर्थिक स्तर उंचावणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये योग्य प्रकारे मृद संधारणाची कामे करून जमिनीची उत्पादकता वाढविणे या उद्देशाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -पाणलोट विकास घटक 2.0 हा प्रकल्प राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!