घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगारांना मुद्देमालासह रंगेहात पकडून गुन्हा उघड

– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

नागपूर :- नागपूर जिल्हा ग्रामीण उपविभाग सावनेर हद्दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात परफोडी व्या संदर्भात दाखल गुन्हयाचे समांतर तपास करण्याचे आदेश दिले, त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्त्याखाली अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींबाबत माहीती घेत शोध करित असतांना विश्वसनीय बातमीदाराकंडुन दि. २३/०९/२०२४ रोजी माहीती मिळाली की, आरोपी मोहम्मद शाबीर उर्फे साबु व त्याचा साथीदार आशिक रजा हे एका विना नंबरचे पांढऱ्या रंगाचे सुझुकी वर्गमन या मोपेड गाडीने गुन्हंयातील चोरी केलेले मुदेमाल विकण्याकरिता कोराडी, खापरखेडा भागाने फिरत आहेत. अश्या माहीती वरून परस्पर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी खापरखेडा ते कामठी रोड बिना संगम टी पॉईन्ट येथे स्टॉफचे मदतीने सापळा रचुन नाकांबदी केली असतांना अंदाजे १३.३० वा. विना नंबरचे पांढऱ्या रंगाचे सुझुकी बर्गमन या मोपेड गाडीने दोन इसम आरोपी क्र. १) मोहम्मद शब्बीर उर्फे सब्बु वल्द मोहम्मद अयुब खान वय २४ वर्षे, रा. टिप्पु सुलतान चौक, पिली नदी यशोधरा नगर नागपुर ०२) आशिक रजा वल्द अयुब रजा अन्सारी वय २३ वर्षे रा. टिष्णु सुलतान चौक, मेहबुब पुरा यशोषय नगर नागपुर हे कामठी ते खापरखेडा रोड विना संगम टी पॉईन्ट कडे येतांना दिसुन आल्याने त्यांना स्टॉफचे मदतीने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपी क. १) यनि सांगीतले की, त्याला नशा करण्याचे व्यसन असल्याने त्या व्यसनामुळे त्याचे अंगावर लोकांचे कर्ज झाले होते व आरोपी क. ०२) याने त्याला शौक पाण्या करिता पैशाची अडचण असल्याने चोरी केल्याचे सांगितले. आरोपी क. २९ जवळुन सोन्याचांदीचे दागिने तसेच आर्टीफिशीयल दागिने, ०७ वेगवेगळ्या कंपनीचे मोवाईल किंमती ४०,०००/-रु., निकॉन कंपनीचा कॅमेरा, लेन्स, चार्जर, वेंगसह किंमती ५०,०००/- रू., एक पांढन्या रंगाची विना क्रमांकाची सुझुकी कंपनीची वर्गेमन मोपेड गाडी किंमती ९०,०००/- रू., नगदी १५,०००/- रूपये असा एकुण ३,६०,२२०/- रू. आरोपी क्र. ०२ यांचेकडुन नगदी २०,०००/रूपये एक ओप्पो कंपनीचा अॅन्ड्राईड मोवाईल किंमती १०,०००/रू मुद्देमाल एकुण ३०,०००/-रू. असा एकुण दोन्ही आरोपीकडून ३,९०,२२०/- रू या मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालासह आरोपी गुन्हयाचे पुढील तपास कामी पोलीस स्टेशन कळमेश्वरचे ताब्यात देण्यात आले.

उघडकीस आणलेले गुन्हे –

१) पो. स्टे. कळमेश्वर अप क्र ८१८/२०२४ कलम ३३१ (४), ३०५ (A) BNS

२) पो. स्टे. कळमेश्वर अप क्र. ८१७/२४ कलम ३३१(३), ३०५ (A) BNS

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, किशोर शेरकी, सहा. पोलीस निरीक्षक सोवत सहा. पोलीस निरीक्षक आशिष ठाकुर, सपोनि सचिन लेडांगे फिंगरप्रिंट विभाग, पोहवा दिनेश आधापुरे, संजय बांते, ईकबाल शेख, पो.हवा प्रमोद भोयर, पो.शि. संजय बरोदिया, मपोहवा रामटेके, नापोहवा शुक्ला, चापोहवा अमोल कुथे, पोअं सुमित बांगडे, सायबर सेलचे नापोशि सतिश राठोड यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काटोल हद्दीत अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई

Wed Sep 25 , 2024
काटोल :- पोलीस ठाणे काटोल हद्दीतील पेठबुधवार परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना मिळाल्याने पोस्टे काटोल हद्दीतील पेठबुधवार परिसरात सुरू असलेल्या अवैधरीत्या गावठी पद्धतीने हातभ‌ट्टी लावुन मोहाफूल गावठी दारू गाळणाऱ्या एकूण ०२ इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या गावठी पद्धतीने हातभट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे ०१ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com