मंत्रालयातील शिपाई कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, फसवलेल्या तरुणांना न्याय द्या – अजित पवार

मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल;वरिष्ठांच्या भूमिकेची चौकशी करुन कडक कारवाई करणार;विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर, दि. ३० डिसेंबर – मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचे नाटक घडवून आणले. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी. दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माहितीचा मुद्दा उपस्थित करुन केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात येईल, असे त्यांनी उत्तरादाखल सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

BRC से हिसाब चुकता करने के लिए RTI का सहारा 

Fri Dec 30 , 2022
– RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रिया में हो रही धांधली पाकर पर्दा डाल जेब गर्म कर रहे URC-1,URC-2 व BRC से सम्बंधित  नागपुर :- RTE कानून अंतर्गत सभी को निकटवर्ती विद्यालयों में शिक्षा का अवसर मिला।इससे विद्यालय प्रबंधन बुरी तरह प्रभावित हुआ.इस RTE की निगरानी के लिए प्रशासन ने समिति बनाई,लेकिन समिति के चुनिंदा सदस्यों ने इसे रोजगार बना लिया।मनचाही विद्यालय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com