आक्रमण युवक संघटनेचे बसपाला समर्थन

– आक्रमण युवक संघटनेने दिला बसपाला पटिंबा 

नागपूर :- नागपुरातील लोकसभेचे युवा तडफदार व बौद्ध समाजाचे योगेश लांजेवार यांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारार्थ संपूर्ण आक्रमण टीम व आक्रमणचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात कामाला लागले. विशेष म्हणजे उमेदवाराकडून कुठलेही रिस्पॉन्स न मिळता किंवा कुठलेही सहकार्यांची अपेक्षा न ठेवता आक्रमण युवक संघटनेने बसपाच्या अधिकृत उमेदवाराला जाहीर समर्थन दिलेले आहे. आणि त्यानिमित्ताने दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण प्रभागात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळेस आक्रमण युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे, जिल्हा सचिव सुरज पुराणिक, अजय गायकवाड, अश्विन पाटील, सनी शेंडे, आदर्श शेंडे, प्रतीक भागवत, विद्या कांबळे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मीटिंगच्या माध्यमातून संविधान व आपल्या देशाला वाचविण्याकरिता बहुजनांची ताकद एकत्रित करून बसपाच्या समर्थनार्थ मतदारांना बाबासाहेबांच्या हत्तीला मजबूत करण्याकरिता आवाहन करण्यात आले. यावेळेस रामबाग, इमामवाडा, इंदिरानगर जाटतरोडी, वंजारी नगर, मायानगर या ठिकाणी मीटिंग घेण्यात आल्या होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

Thu Apr 18 , 2024
– कडेकोट पोलिस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष – रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे – आज रवाना होणार मतदान पथके – बाहेरगावातील मतदारांनाही आवाहन नागपूर :- नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!