महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांची दिलखुलास, जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

महिलांना संघटित करून, प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे याचबरोबर राज्यातील बालकांचे संरक्षण व्हावे, त्याचे हक्क अबाधित राहावे यासाठी राज्य शासन विविध योजना व उपक्रम राबवित आहे. पदपथावरील किंवा बेघर असणाऱ्या असुरक्षित महिला व बालकांचे पुनर्वसन व्हावे यासाठीही वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनामार्फत घेण्यात आलेले निर्णय मुंबई शहर जिल्हास्तरावर कशा प्रकारे राबविण्यात येत आहे, याबाबत महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती शेलार यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून शेलार यांची मुलाखत शनिवार दि. 16, सोमवार 18, आणि मंगळवार दि. 19 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, 21 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओबीसी कुटूंबातील सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्रावर आवास योजनेचा लाभ देण्यास सुट द्या - सतीश घारड 

Sat Dec 16 , 2023
– खंड विकास अधिकाऱ्यांना निवेदन  कन्हान :- राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) पात्र कुटुंबांना घरकुल या योजनेतून लाभ मिळणार आहेत.योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली असून ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल लाभासाठी जातीचे प्रमाणपत्र तयार करतांना समस्या येत आहे, अश्यात पात्र लाभार्थ्यांच्या रक्ताच्या कुटूंबातील सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com