मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘सखी कॅराव्हॅन आणि पर्यटन’ संदर्भात सुनीता नेराळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 3 मे, गुरुवार दि. 4 मे 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
‘सखी कॅराव्हॅन आणि पर्यटन’ संदर्भातील सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून नेराळे यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.