राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांची ‘दिलखुलास’,’जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई :- शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महावाचन उत्सव -2024 बाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांची मुलाखत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत प्रकल्प संचालक आर. विमला यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘महावाचन उत्सव 2024’ च्या आयोजनामागची भूमिका, उपक्रमाचे स्वरुप, विद्यार्थ्यांचा सहभाग व उपक्रमाची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत, शुकवार दि.30 आणि शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक शिवानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन, जनतेच्या विकासासाठी शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri Aug 30 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. ते देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्य सरकार महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आयटीसी ग्रँट सेंट्रल हाँटेल मुंबई येथे न्युज १८ इंडिया या वाहिनीच्या डायमंड स्टेट समिट महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे प्रगतिशील महाराष्ट्र या चर्चेत बोलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com