भंडारा :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीच्या पुर्वातयारी संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांची ‘कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर मंगळवार दि. 9 एप्रिल 2024 रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत भंडारा जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाची पुर्वतयारी कशा पद्धतीने सुरु आहे ‘याविषयी ‘ दिलखुलास कार्यक्रमातून भंडारा जिल्हयाचे पोलिस अधिक्षक मताणी यांनी माहिती दिली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR