जागतिक महिला दिन पराडशिंगा येथे साजरा, शेकडो महिलांची उपस्थिती

काटोल :- आठ मार्च 2023 ला संत सावता महाराज सभागृह पारडशिंगा येथे क्रांतीदेवी सावित्री आई फुले विचारमंच द्वारा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम तथा स्त्री सक्षमीकरण या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तिरंगा मंडळाचे संस्थापकअध्यक्ष तथा सावित्री विचारमंच काटोलच्या अध्यक्ष वैशाली संजय डांगोरेया होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. कवयत्री शितल कांडलकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून माधवी डांगोरे ,प्रभा डांगोरे यांची उपस्थित होती .

या जागतिक महिला दिना स्त्रियांनी अनेक सांस्क्रुतीक कार्यक्रम आणि अनेक खेळ ,गीत, पोवाडे ,संगीत खुर्ची ,वन मिनिट शो ,डान्स आणि स्त्री सक्षमीकरणाबद्दल विचार सांगन्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्री फुले विचार मंच पारडसिंगा शाखेचे अध्यक्ष सुचिता खरबडे तथा सचिव नीता बोढाळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी टेंबे तर आभार प्रदर्शन प्रियंका डांगोरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साधना तिजारे ,पल्लवी वरोकर, जोशना वरोकर ,दूजाली बेलसरे, मीनल चोपडे ,सविता चोपडे, गायत्री डांगोरे ,कांचन चोपडे, प्रियंका बेलसरे ,स्नेहल तिजारे, भाग्यश्री येवले ,स्मिता तिजारे, हर्षा डांगोरे ,आदि सावित्री विचार मंच च्या सर्व सदस्या आदी शेकडो महिलांची यावेळी उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सी-20 परिषदेसाठी नागपूर सज्ज होत आहे, अजनी चौकात वैविद्यपूर्ण वृक्ष लागवड आणि पथदिवे

Sat Mar 11 , 2023
नागपूर :- जी-20 परिषदेंतर्गत शहरात होऊ घातेल्या सी-20 परिषदेसाठी सौंदर्यीकरणाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान वैविद्यपूर्ण वृक्ष लागवड होत आहे. तर डेकोरेटिव्ह पोल लाईट्स उभारणीच्या कामालाही गती आली आहे.            सीताबर्डीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वैविद्यपूर्ण वृक्ष लागवड होत आहे. याठिकाणी आलामंगा, ट्रावलर्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com