अरोली :- येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत भांडेवाडी येथे आज दिनांक आठ मार्च शनिवारला सरपंचा मंगला विष्णू देशमुख यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण, पूजा अर्चना करून त्यांच्या व समाजासाठी झटणाऱ्या इतर महिलांवरही उपस्थित मान्यवर महिलांनी प्रकाश टाकून व त्यांचे अनुकरण करण्याचे आव्हान करून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंचा मंगला विष्णू देशमुख, ग्रामपंचायत सदस्यगण अंजीरा ईश्वर राऊत, वंदू नितेश चौधरी, ललिता रामेश्वर मरस्कोल्हे , ललिता लक्ष्मण परतेती,अनिता बावनगडे ,सचिव अश्विनी लोखंडे, अंगणवाडी सेविका रेखा धुर्वे, इंदिरा कोलते, नेहा वरठी, निशा मंडळी, कल्पना सलामे, शेवंती गेडाम, शारदा वरठी, लक्ष्मी गेडाम, बबिता टेकाम, सुनिता टेकाम ,आरती टेकाम, रोशनी राऊत, प्रिया वाढवे सह कर्मचारीवृंद इतर गावकरी महिला मंडळी व बालगोपाल उपस्थित होते.