कापूस उत्पादन वाढीसाठी अतिघन लागवड करावी – डॉ.वाय.जी.प्रसाद संचालक

नागपूर :- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्रीज कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशन मुंबई च्यावतीने 23 मार्च रोजी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने आयसीसीएआर सीआयसीआर नागपूर येथे कापूस शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. वाय.सी.प्रसाद संचालक केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांची उपस्थिती होती. यासोबतच डॉ.ए.एल. वाघमारे संचालक कापूस विकास संचालनालय नागपूर, रवींद्र मनोहरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डॉ.अर्जुन तायडे विभाग प्रमुख, सीआयसीआर डॉ.के. पांडियन वरिष्ठ शास्त्रज्ञ जीटीसी सिरकॉट नागपूर आणि गोविंद वैराळे प्रकल्प समन्वयक सिटीसीडीआरए नागपूर, दिलीप ठाकरे प्रगतिशील शेतकरी अकोला, अमोल शिरसाट महाव्यवस्थापक अंकुश सीडस, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शैलेश गावंडे आणि डॉ. मणिकंदन डॉ. रामकृष्ण हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.वाय.सी.प्रसाद यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी एक एकर क्षेत्रामध्ये एक लाख कापूस झाडांची संख्या वाढवून कापसाची उत्पादन कसे वाढविता येईल ? व ऑस्ट्रेलिया ब्राझील या देशांचे उदाहरण देताना तेथील उत्पादन आणि आपल्याकडील उत्पादनामध्ये येवढा तफावत याबाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रवींद्र मनोहरे यांनीही कापसाचे मूल्यवर्धन करण्यासाठी एफपीओ स्थापन करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आणि स्मार्ट प्रकल्पा विषयी ही माहिती दिली. आणि डॉ.के पांडियन यांनी कापसाची गुणवत्ता कशाप्रकारे राखता येईल. असे मत व्यक्त करित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेत. डॉ.ए.एल.वाघमारे यांनी कृषी मंत्रालयाच्या अतिघन कापूस लागवड पद्धतीच्या पथदर्शी प्रकल्पाविषयी माहिती दिली. वर्धा जिल्ह्यातील जैन यांनी अतिघन कापूस लागवड पद्धतीमुळे अधिक उत्पादन घेतल्याचे आणि शेतकऱ्यांना अतिघन कापूस लागवड पद्धतीचा अवलंब करण्याचे यावेळी सांगितले. शेतकरी मेळाव्यात विदर्भ स्तरावरील ज्या शेतकऱ्यांनी जास्त उत्पन्न घेतलेत त्यांचा सिटीसीडीआरए च्यावतीने मानचिन्ह देऊन व सत्कार करण्यात आलेत. शेतकरी मेळाव्याच्या आयोजनात प्रकल्प अधिकारी जगदीश नेरलवार, अमित कावडे, युगांतर मेश्राम आणि रिदद्धेश्वर आकरे तसेच कापूस विस्तार सहाय्यक यावेळी उपस्थित होते तर विदर्भातील सुमारे 250 शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार गोविंद वैराळे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नितिन गडकरी का अभिनंदन एवं स्वागत

Sat Mar 30 , 2024
नागपूर :- सकल माहेश्वरी समाज द्वारा गुरुवार दिनांक 28 मार्च को लोकसभा नागपुर से बीजेपी के वर्तमान सांसद, केंद्रीयमंत्री एवं आगामी लोकसभा उम्मीदवार नितिन गडकरी का उनके निवास स्थान पर जाकर पुष्प गुच्छ द्वारा स्वागत अभिनंदन किया। साथ ही भगवान श्रीकृष्ण की मूर्ति के रुप में मंगल शुभकामनाएं दी गई। इस अवसर पर माहेश्वरी समाज प्रतिनिधि के रुप में नगर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com