वरुड येथे ‘एमआयडीसी’ उभारण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ! 

– आ. देवेंद्र भुयार यांच्या मागणीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल !

– फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी वरूड येथे निर्माण होणार एमआयडीसी ! 

वरूड :- अमरावती जिल्ह्यात उत्पन्नवाढी बरोबरच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. युवकांना मतदार संघाताच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वरुड येथे फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून एमआयडीसी चा मुद्दा रेटून धरला त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दखल घेऊन मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुड येथे ‘एमआयडीसी’ उभारण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात यापुढे नवीन ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता करुन देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ‘एमआयडीसी’ची आढावा बैठक वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याच्या विकासात उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. राज्यातील प्रत्येक विभागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ‘एमआयडीसी’ उभारण्यासाठीचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करा. तसेच ‘एमआयडीसी’च्या उभारणीसाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक असल्याचे सांगून या ठिकाणी फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांच्या सोबत जागेची पहाणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण लहामटे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अतुल बेनके (व्हिसीद्वारे), आमदार नितीन पवार (व्हिसीद्वारे), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व्हिसीद्वारे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CPS WN CELEBRATES GURUPURNIMA

Thu Aug 1 , 2024
Nagpur :- On 26th July 2024, Centre Point School, Wardhaman Nagar celebrated the pious occasion of Gurupurnima. A skit was performed in Sanskrit to glorify our rich heritage and tradition.Students of classes 6,7 and 8 participated wholeheartedly in the festivities.The students were trained by the Sanskrit Department alongwith help from the Dance and Music Departments. The audience consisting of parents […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!