प्रभाग 15 मधे हायमस्ट सोलर लाईट लावा – नगरसेविका संध्या रायबोले यांचे निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-प्रभाग 15 तील सैलाब नगर, सुदर्शन नगर, गौतम नगर, आनंद नगर, रमानगर, रामगढ, विक्तुबाबा नगर येथील वर्दळी च्या ठिकाणी हायमस्ट सोलर लाईट पोल लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना आज बुधवारी दुपारी दिले.

देशात मुबलक प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध असून फक्त हायमस्ट सोलर लाईट पोल उभारण्याचा खर्च लागणार असून विजेचा कोणताही खर्च येणार नाही करिता प्रभाग 15 येथील सैलाब नगर,समता सैनिक दल मैदान, मदरसा नुरुल इस्लाम, सुदर्शन नगर हनुमान मंदिर, गौतम नगर नगर परिषद व्यापारी संकुल, मातोश्री रमाई पुतळा, रमा नगर अत्त दिप भव बुद्ध विहार, सम्यक संबुद्ध बुद्ध विहार, विक्तु बाबा नगर विक्तु बाबा मंदिर, आनंद नगर वाचनालय येथे हायमस्ट सोलर लाईट पोल लावण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे,निवेदनावर मनोज मेथिया,निलेश बरसे, नितिन मनपिया,करण ग्रावकर,अजय बरोंडे,अविनाश गजभिये, गजवे,मनिष डोंगरे,रोहित दहाट,दिनेश यादव, मोंटु जनबंधु,प्रियांशु इंगोले, जमील अहमद, साजिद खान,वसीम हैदरी,अब्दुल गणी, सुर्यकांता चवरे, एड रिना गणवीर, मनिषा माटे, रोशन रामटेके, श्यामराव मैंद, किशोर शर्मा यांच्या स्वाक्षरी आहे, निवेदनाची प्रत माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोपविली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहिम अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Wed May 10 , 2023
मुंबई :- मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com