नागपूर :-दि.26 नोव्हेंबर 2023 अर्थात भारतीय संविधान दिनानिमित्त एक लाख संविधान वाटपाचा शुभारंभ समारंभ दादर, मुंबई येथे पार पडला. कार्यक्रमारंभी आम्ही तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान असलेल्या राजगृह व तेथील परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. राजगृहावर जावून बाळासाहेब आंबेडकर साहेबांची भेट घेतली. या प्रसंगी बाळासाहेबांनी भारतीय संविधानाचे संरक्षण व धम्म प्रचारा संबंधी महत्वाची चर्चा केली. या प्रसंगी माझ्या सह अखिल भारतीय कांग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय प्रभारी के.राजू , अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया , राज्याच्या माजी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा.वर्षा गायकवाड, कचरू यादव,प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे तसेच काँग्रेस राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.राजगृहावरील आदरणीय प्रकाश तथा (बाळासाहेब) आंबेडकर साहेबांची भेट अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे..!