संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साई मंदिर आडा पुलियासमोरून अवैधरित्या गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी कामठी कडे भरधाव वेगाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचलकाने पोलिसांच्या वाहनाला कट देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून फिल्मी स्टाईल ने पाठलाग केला असता आरोपी वाहन चालकाने जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत वाहन नेऊन पोलिसांपासून बचाव करण्याहेतू बोरकर चौकातून दुचाकीने नोकरीवर जात असलेल्या वडील व त्यांच्या मुलीला जोरदार धडक देऊन जख्मि करीत पिली हवेली चौकाकडे पळ काढला ,वाहनांची गती अधिक असल्याने गोवंश जनावराने लादून असलेले वाहन थेट चौकात उलटल्याची घटना आज सकाळी सात दरम्यान घडली असून चोर पोलिसांच्या या जीवघेण्या पाठलागेत नोकरीवर जात असलेले निर्दोष वडील व मुलगी अपघाती जख्मि होऊन सदर घटनेला नाहक बळी पडले तर या घटनेत पोलिसांनी 6 गोवंश जनावरांना ताब्यात घेत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले तर या घटनेतून 6 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 50 हजार रुपये, चारचाकी अशोक ले लॅंड कंपनीची मालवाहक गाडी किमती 5 लक्ष रुपये असा एकूण 6 लक्ष 50 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी इशाक बबलू तांडी वय 18 वर्षे रा कामगार नगर कामठी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले तसेच पसार आरोपी मध्ये शाहरुख नावाचा इसम वय 34 वर्षे रा येरखेडा ,चारचाकी अशोक लेलॅन्ड क्र एम एच 40 सी डी 2882 चा मालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हे पसार आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एम एच 40 सी डी 2882 च्या चालक सदर घटनास्थळ मार्गे कामठी कडे कत्तलखान्यात जनावरे वाहून नेत असता पोलिसांनी आपली शासकीय वाहन क्र एम एच 31 डी झेड 0205 ने वाहन थांबविन्याचा प्रयत्न केला असंता आरोपीने पोलिसांच्या या शासकीय वाहनाला कट देऊन पळ काढला दरम्यान पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून वाहन पकडण्याचा प्रयत्न करीत असता पोलिसांचा पाठलागेत बचाव करण्याहेतु आरोपी वाहन चालकाने आपल्या वाहनांची गती वाढवून बेधुंद पद्धतीने वाहन चालवीत बोरकर चौकातून दुचाकी क्र एम एच 36 यु 0043 ने नोकरीवर जात असलेले 54 वर्षीय वडील अरविंद वर्मा व 23 वर्षीय रोशनी अरविंद वर्मा ला जोरदार धडक देऊन जख्मि केले. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली .तर पुढे जाऊन सदर गोवंश जनावरे वाहून नेत असलेले वाहन पिली हवेली चौकात उलटले दरम्यान पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक करण्यात आले इतर आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.