अन्यायाची शिदोरी गोवारांच्या पदरी, केव्हा मिळेल न्याय, या सरकारच्या दरबारी

28 व्या शहीद वर्धापन दिनानिमित्त

नागपूर : गोवारी हत्याकांडाला आज एकूण 28 वर्षे पूर्ण झाले तरीही आदिवासी बांधवांना न्याय मिळालेला नाही गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी, आदिवासी लोक मोर्चा काढतात, आंदोलन करतात, परंतु आज पर्यंत न्याय मिळाला नाही ?

१९९४ पासून ४ ते ५ सरकार बदलले तरीसुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही. गोवारी बांधव आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आंदोलन करतात कशासाठी ? पण त्यात काय फायदा झाला ?

1994 साली चेंगराचेंगरीमध्ये 114 आदिवासी लोकांना जीव गमवावा लागला. त्यावेळेस काँग्रेसची सरकार होती. शरद पवार मुख्यमंत्री होते. त्या आदिवासी बांधवांनी शरद पवारांना भेटण्याची एक आपुलकी निर्माण करून आपल्या हक्कासाठी आंदोलन केली. परंतु त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही म्हणून ते दटून उभे राहिले परंतु त्यावेळेस शरद पवारांनी भेटण्यास नकार दिला. त्यादरम्यान 114 बांधवांना चेंगराचेंगरीत आपला जीव गमवावा लागला. हिवाळी अधिवेशनात त्यावेळेसचे विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्यांना यश मिळाले नाही. म्हणून आदिवासींनी पाऊल उचलून अधिवेशनाकडे धाव घेतली असता त्यावेळेस अचानक पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये आदिवासी बांधवांना जीव गमवावा लागला. तरीही न्याय मिळालेला नाही. आज झिरो माईल स्मारक परिसरात 28 व्या वर्धापन दिनानिमित्त एक छोटासा आदिवासी बालक न्यायासाठी हक्काने उभा आहे.

बघा कोण न्याय देणार ? कोणती सरकार न्याय देणार ? यामध्ये वाट बघत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंबाझरी गार्डन विस्तारीकरणावर बसपाने आक्षेप नोंदवला, डॉ आंबेडकर सभागृहासाठी 20 एकर जागेची मागणी 

Thu Nov 24 , 2022
नागपूर :- महाराष्ट्र शासनाने अंबाझरी गार्डन विस्तारीकरणाच्या संदर्भात 24 ऑगस्टला अध्यादेश काढून आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. त्यावर बहुजन समाज पार्टीने 26 सप्टेंबर रोजी आक्षेप नोंदवून अंबाझरी गार्डन परिसरातील 20 एकर जागा डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. बसपा ने 20 एकड जागा आरक्षित ठेवणे, सांस्कृतिक भवन तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करणे, आंबेडकर सांस्कृतिक भवन विकसित करताना लायब्ररी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com