– 25 जून ते 24 जुलैकालावधीत विशेष मोहीम
नागपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचीत राहू नये याकरीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचासंक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (SSR) घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात नमुना क्र. 6 गोळा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले आहे. नागपूर जिल्हयात 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 27 मार्च रोजी प्रसिध्द मतदार यादीत ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नाही अशा मतदारांची नोंदणी करुन घेण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते. संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) 25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहेत. जे मतदार 18 वर्षाचे झालेले आहेअशा पात्र मतदारांचे नमूना क्र.6 भरुन घेतील. मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार वजे मतदार त्यांचे पत्त्यावर आढळत नाही, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करुन मतदार यादीतील तृट्या दूर करतील, असेही श्री. ठोंबरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण करावयाचे असून याअंतर्गत आवश्यकतेनुसार मतदारांना मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात, पत्त्यात बदल करुन घेता येईल. सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत (Integrated) मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल.याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबीर आयोजित करण्यात येईल. (शिबिराचा दिनांक मुख्य निवडणूक अधिकारी निश्चित करेल) विशेष शिबिराचे दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपले जवळील मतदान केंद्रावर सर्व साहित्यासह उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुनाक्र. 6, 7 आणि 8 स्वीकारतील व 19 ऑगस्टपर्यत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावेव हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.नागपूर जिल्हयातील मतदार यादीचे शुध्दीकरणाचे काम आगामी विधानसभा, नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येत असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हयातील सर्व मतदारांना तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन केलेले आहे.
ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नसेल अशा मतदारांनी आपले नाव नियमानुसार आवश्यक कागदपत्रासह नमुनाक्र. 6 भरुन विहीत मुदतीत मतदार यादीत समाविष्ठ करण्याबाबचा अर्ज Online(https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ किवा Voter Helpline App) Offline (मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी इ.) येथे सादर करणेबाबत आवाहन करण्यात आले.