इन्फोसिस फाऊंडेशन डायबिटीस केअर प्रोग्राम टाइप 2 मधुमेह मुक्तीसाठी मदत करेल , अडोर च्या सहकार्याने नागपुरात दुसरे मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्र उघडण्यात येणार आहे

नागपूर :- इन्फोसिस फाउंडेशन,इन्फोसिस ची परोपकारी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शाखेने आज नागपूरमध्ये असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) या संस्थेच्या सहकार्याने दुसरे डायबेटिस रिव्हर्सल काउंसिलिंग सेंटर उघडण्याची घोषणा केली. याआधी, इन्फोसिस फाऊंडेशनने जीवनशैलीत बदल करून रुग्णांमध्ये टाइप 2 मधुमेह कमी करण्यासाठी मदत करण्यासाठी अडोर बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या उपक्रमात तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे आणि नागपूरमधील दोन केंद्राचा समावेश आहे ज्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक मधुमेह दिनानिमित्त पुणे केंद्राने यावर्षी २१ नोव्हेंबर रोजी कामकाज सुरू केले.

या उपक्रमाचे 3 वर्षांतील 12,000 रूग्णांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. जीवनशैलीतील बदलांद्वारे, अडोर रक्तातील साखरेची पातळी आणि वजन कमी करणे यासारख्या बाबींवर आधारित रुग्णांच्या प्रगतीचे मूल्यांकन करेल. याव्यतिरिक्त, कमीतकमी 50 टक्के रुग्णांमध्ये मधुमेहावरील औषधांचा डोस कमी करण्याचा मानस आहे.

नागपूर येथील डायबेटिस रिव्हर्सल काउंसिलिंग सेंटर 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून, रुग्णांना मोफत काउंसिलिंग सेवा पुरवणार आहे. सेंटर 5 ते 14 डिसेंबर या दहा दिवसांसाठी मोफत एचबीए1सी चाचणी शिबिर देखील आयोजित करेल जेथे लोक विनामूल्य चाचणीसाठी नोंदणी करू शकतात. नाव नोंदणीसाठी 8830825209, 8830824438 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता आणि केंद्राचा पत्ता खालील प्रमाणे आहे :

पिंगळे निवास, सिटी सर्व्हे नंबर 948, हिंगणा रोड, दीनदयाळ नगर, नागपूर

इन्फोसिस फाऊंडेशनचे विश्वस्त सुनील कुमार धारेश्वर म्हणाले, “हजारो रूग्णांमध्ये टाइप 2 मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी अडोर सोबत सहकार्य करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. रुग्णांच्या जीवनशैलीतील साध्या बदलांना प्रोत्साहन देऊन आणि सक्षम करून त्यांचे जीवन सुधारण्याच्या आमच्या सामायिक दृष्टीमुळे हा समन्वय साधला गेला आहे. आम्हाला खात्री आहे की, अडोर च्या देखरेखी आणि मार्गदर्शनासह ही छोटी पावले लोकांच्या आरोग्यामध्ये खूप मोठा बदल घडवतील.”

असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) चे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, “आम्ही पुणे आणि नागपूरमधील रुग्णांसाठी टाइप-2 मधुमेह मुक्तीसाठी प्रयत्नशील असताना इन्फोसिस फाऊंडेशनच्या पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो. मधुमेह तज्ज्ञांद्वारे तपासणी आणि समुपदेशन यासह लवकरच कार्यरत होणारे नागपूर सेंटर वैयक्तिक काउंसिलिंग आणि मार्गदर्शन प्रदान करेल. आम्हाला आशा आहे की जास्तीत जास्त लोकांचे जीवन अधिक चांगले होण्यासाठी हा प्रयत्न केल्याने आमच्या प्रयत्नांना मोलाचे पाठबळ मिळेल.

इन्फोसिस फाउंडेशन बद्दल

1996 मध्ये स्थापित, इन्फोसिस फाउंडेशन शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, कला आणि संस्कृती आणि निराधारांची काळजी या क्षेत्रातील कार्यक्रमांना समर्थन देते. देशभरातील वंचितांसोबत काम करणे आणि अधिक न्याय्य समाजासाठी प्रयत्न करणे हे तिचे ध्येय आहे. इन्फोसिस फाऊंडेशनला समाजातील सर्व वर्गांसोबत काम करण्यात, अनंत काळजीने प्रकल्प निवडण्यात आणि समाजाकडून पारंपारिकपणे दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रात काम करण्यात अभिमान वाटतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठी अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. राकेश कभे यांची निवड

Thu Dec 1 , 2022
पारशिवनी :- रा. तू. म.नागपूर विद्यापीठ नागपूर निवडणूक 2022 मराठी अभ्यास मंडळावर महात्मा गांधी कला-वाणिज्य महाविद्यालय पारशिवनी येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. राकेश कभे हे अविरोध निवडून आले.निवडून आल्याबद्दल व्ही.एस.पी. एम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूरचे अध्यक्ष रणजीत देशमुख,संस्थापक डॉ.भाऊसाहेब भोगे, डॉ. आशिष देशमुख, कार्यवाह युवराज चालखोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लोकचंद्र जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व तालुका पत्रकार संघटना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com