मध्यवर्ती कारागृहात सर्च ऑपरेशन – दोनशे पोलिसांचा ताफा -गांजा, मोबाईल बॅटरी प्रकरण

नागपूर – मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असलेला मोक्काचा आरोपी सूरेश कावळे जवळ गांजा आणि 15 मोबाईलच्या बॅटर्‍या मिळाल्या. याप्रकरणामुळे पोलिस वर्तुळात आणि कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल  घेत कारागृहात सर्च ऑपरेशनचे आदेश दिले. त्यानुसार बुधवार 7 सप्टेंबरला सकाळपासूनच कारागृहाची झाडाझडती सुरू झाली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, झोन-2 चे पोलिस उपायुक्त संदीप पखाले यांच्या नेतृत्वात 200 पोलिसांचा ताफा होता. या प्रकरणी धंतोली ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला आहे. लवकरच त्याला प्रोडक्शन वारंटवर अटक केली जाईल. फैजान परवेझ मन्सूरी (20), रा. कळमना, भवानी नगर असे आरोपीचे नाव आहे. याच्याकडे 55 मिली. ग्रॅम गांजा मिळून आला. त्याचा मित्र लकी शर्मा याने त्याला गांजा आणून दिला होता. त्याच्या विरुद्ध एनडीपीएस 1985 कलम8(क),20(ब),2()29 अन्वये धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हेशाखेकडून सरकार तर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फैजानवर हत्येचा आरोप आहे. तो न्यायाधीन बंदी आहे. वॉर्ड नं. 4 मध्ये तो बंदिस्त आहे.

सकाळपासूनच झाडाझडती सुरू झाली. पोलिसांचा ताफा कारागृहातील प्रत्येक बराकची आणि बराकमधील कपडे, सामान, फाईलची झडती घेत होते. याकामी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. यावेळी प्रचंड धावपळ आणि सतर्कता दिसून आली.

मोठ्या प्रमाणावर पोलिस ताफा पाहून एक दोन दिवसांसाठी आणलेली न्यायाधीन बंदीत चर्चेला उधान आले होते. तर रस्त्याने जाणारेही काही वेळ थांबून काय झाले म्हणून चर्चा करीत होते. दरम्यान फैजानकडून 55 मिली. ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांच्या झडती दरम्यान एकही मोबाईल मिळाला नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.

मोबाईल बॅटरी आणि अंमली पदार्थाचे प्रकरण गाजत असून या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी कारागृह प्रशासनाचे एक पथक पुण्याहून येणार आहे. यापुढे पुण्याचे पथक नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात झाडाझडती घेणार आहे.

10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयात आरोपींना फाईल देण्याच्या बहाण्याने गांजा आणि मोबाईल बॅटरी पोहोचविल्याच्या आरोपात पोलिसांनी सूरजचा भाऊ शुभमसह 6 आरोपींना अटक केली आहे. सूरज वाघमारे, भगीरथ खारगयाल, अथर्व खटाखटी, मोरेश्वर सोनोने, मुकेश उर्फ बाबू नायडू अशी अटकेतील इतर आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. निलंबित कर्मचार्‍यात पोलिस हवालदार प्रकाश मसौदे आणि नापोशि हेमराज राऊत यांचा समावेश आहे

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यात्रियों की मांग पर बढ़ाई फेरिया.

Fri Sep 9 , 2022
सोमवार से सुबह ६.१५ से रात १० बजे तक मेट्रो सेवा उपलब्ध नागपुर :-  सुबह के समय आवागमन के लिए नागरिकों की आवश्यकता के अनुसार मेट्रो सेवा उपलब्ध हो इस बात को ध्यान में रखते हुए महामेट्रो ने ट्रेनों की फेरियों में वृद्धि करने का निर्णय लिया है । नई समयसारिणी के अनुसार आगामी १२ सितंबर से एक्वा और ऑरेंज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com