उत्पादनाच्या दर्जाबाबतची माहिती विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना फायद्याची- ईशा खुराणा

मानवता शाळेत ‘स्टॅन्डर्ड क्लब’ जनजागृती अभियान उत्साहात.
भारतीय मानक संस्थेचा (ब्युरो) स्तुत्य उपक्रम.

नागपुर – औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्टॅन्डर्ड क्लब’ची केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय मानक संस्थेने (ब्युरो) केली आहे. ‘स्टॅन्डर्ड क्लब’द्वारे घेण्यात येणाऱ्या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती सामान्य नागरिकांसाठी फायद्याची ठरणार आहे, असे प्रतिपादन स्टॅन्डर्ड प्रोग्राम ऑफीसर ईशा खुराणा (भारतीय मानक ब्युरो) यांनी केले. औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय मानक संस्थेने (ब्युरो) देशभरातील विविध शाळांमध्ये ‘स्टॅन्डर्ड क्लब’च्या माध्यमातून जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता प्राथमिक व हायस्कूल येथे ‘स्टॅन्डर्ड क्लब अ‍ॅक्टीव्हीटी प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले त्यावेळी ईशा खुराणा या बोलत होत्या. ‘स्टॅन्डर्ड क्लब’ जनजागृती अभियानाचे उद्घाटन स्टॅन्डर्ड प्रोग्राम ऑफीसर ईशा खुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मानवता प्राथमिक व हायस्कूलच्या मुख्यध्यापिका चारूशिला डोंगरे तर प्रमुख पाहुण्यांमध्ये भारतीय मानक ब्युरोचे सेवानिवृत्त अधिकारी डाॅ. ए. एन. वर्मा, भारतीय मानक ब्युरोचे सेवानिवृत्त अधिकारी खैरकर , मृदुला देशपांडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ईशा खुराणा म्हणाल्या की, ‘स्टॅन्डर्ड क्लब अ‍ॅक्टीव्हीटी प्रोग्राम’द्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रम, स्पर्धा व इतर विविध माहितीच्या आधारे विद्यार्थी कालांतराने घरोघरी औद्योगिक उत्पादनाच्या दर्जा तपासणीचा अभ्यासाबाबत जनजागृती करतील. मग हे विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शेजारील नागरिक, नातेवाईकांपर्यंत औद्योगिक उत्पादनाच्या दर्जा तपासणीची माहिती पोहचवतील. त्यामुळे कमी दर्जाच्या वस्तूंबाबत सामान्यांना माहिती मिळेल आणि भविष्यात निम्न दर्जाच्या वस्तूंपासून सामान्यांची सुरक्षा होण्यास मदत होईल, असेही यावेळी ईशा खुराणा म्हणाल्या. यावेळी केंद्राच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या अखत्यारित भारतीय मानक संस्थेच्यावतीने आयोजित ‘स्टॅन्डर्ड क्लब’च्या स्पर्धांमध्ये मानवता शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठी हजेरी लावली. यात विद्यार्थ्यांना आएसआय व हालमार्क कसे तपासायचे याबाबतही महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच 30 विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. 30 विद्यार्थी झालेल्या या स्पर्धेत पहिल्या चार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रथम स्थान पटकाविणारी नवव्या वर्गाची सिद्धी गायकवाड हिला 1 हजार रूपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय स्थान अभिषेक शेंद्रे सातशे रूपये रोख व प्रमाणपत्र, तृतीय स्थानी स्नेहल हजारेला 500 रूपये रोख व प्रमाणपत्र तसेच उत्तेनार्थ बक्षिस प्रणाली रामटेके हिला अडीजशे रूपये रोख देऊन तिचा गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पि. एम. शेळकी सर यांनी तर आभार प्रतिभा महल्ले  यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मनपा प्रशासन सज्ज

Fri Sep 9 , 2022
३९० कृत्रिम टॅंक, झोननिहाय २४ फिरते विसर्जन कुंड : एक हजारावर कर्मचारी तैनात नागपूर  : सर्वत्र मोठ्या हर्षोलासात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी 9 सप्टेंबर रोजी सांगता होत आहे. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. शुक्रवारपासून श्री गणेशाचे विसर्जन होणार असून नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com