भारतातील चलनवाढ आणि आर्थिक कल

स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या इकोरॅपच्या 12 मार्च 2025 रोजी प्रकाशित झालेल्या नवीनतम आवृत्तीत फेब्रुवारी 2025 मधील भारताच्या आर्थिक स्थितीचे तपशीलवार विश्लेषण दिले आहे. या आवृत्तीत ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई, औद्योगिक वाढ, आयात वस्तूंच्या किंमतीतील वाढीमुळे देशांतर्गत वाढलेल्या किंमती आणि कॉर्पोरेट कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे . या अहवालात महागाईत, विशेषत करुन अन्न आणि पेयांच्या किंमती नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे, तसेच चलनविषयक धोरण आणि औद्योगिक उत्पादनातील भविष्यातील कलाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.

ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई नियंत्रण

• अन्न आणि पेयांच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे फेब्रुवारी 2025 मध्ये भारताच्या ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढीचा दर 7 महिन्यांच्या नीचांकी पातळी वर म्हणजे 3.6% वर आला.

• भाज्यांच्या किमतींमध्ये तीव्र घट झाल्यामुळे अन्न आणि पेयांचा महागाई दर 185 बेसिस पॉईंटसने (प्रति माह) कमी होऊन 3.84% वर पोहोचला.

• भाजीपाला ग्राहक किंमत निर्देशांकात तीव्र घट झाली आणि त्याने 20 महिन्यांत पहिल्यांदाच नकारात्मक दर (1.07%) नोंदवला.

• इंधन आणि विद्युत चलनवाढ 18 व्या महिन्यातही सुरूच राहिली आहे.

• एकूण महागाई नियंत्रणात असताना,14 महिन्यांनंतर मुख्य चलनवाढीचा दर 4.0% चा टप्पा ओलांडून 4.08% वर पोहोचला.

भविष्यातील ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाईचा कल

• ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढीचा दर आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत 3.9% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे आणि तो आर्थिक वर्ष 2025 साठी सरासरी 4.7% राहील.

• आर्थिक वर्ष 2026 चा चलनवाढीचा दर 4.0-4.2% च्या दरम्यान अंदाजित आहे, तर मुख्य चलनवाढीचा दर 4.2-4.4% च्या दरम्यान असू शकतो .

• रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एप्रिल आणि ऑगस्ट 2025 मध्ये सलग दर कपात लागू करू शकते, ज्यामध्ये एकूण अपेक्षित एकत्रित दर कपात किमान 75 बेसिस पॉईंट्स असेल.

• ऑगस्ट 2025 मध्ये मध्यंतरानंतर ऑक्टोबर 2025 पासून दर कपातीचे चक्र सुरू राहू शकते.

आयात वस्तूंच्या किंमतीतील वाढीमुळे देशांतर्गत वाढलेल्या किंमती

• ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) महागाईत एकूण घट झाली असली तरी, आयात वस्तूंच्या किंमतीतील वाढीमुळे देशांतर्गत वाढलेल्या किंमती जून 2024 मध्ये 1.3% वरून फेब्रुवारी 2025 मध्ये 31.1% पर्यंत वाढल्या .

• मौल्यवान धातू, तेल, फॅट्स आणि रासायनिक उत्पादनांच्या वाढत्या किमती हे या वाढीचे प्रमुख घटक आहेत.

• आयातित महागाईमध्ये ऊर्जेच्या किमतींचा वाटा नकारात्मक आणि निरपेक्ष प्रमाणात कमी होत आहे.

औद्योगिक वाढ आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक विस्तार

• भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक जानेवारी 2025 मध्ये 5.0% ने वाढला, जो आठ महिन्यांतील सर्वाधिक आहे, जो डिसेंबर 2024 मध्ये 3.2% होता.

• या वाढीला पुढील घटकांमुळे चालना मिळाली:

उत्पादन क्षेत्र: 5.5% वाढ

खाण क्षेत्र: 4.4% वाढ

प्राथमिक वस्तू: 5.5% वाढ

ग्राहकोपयोगी वस्तू (दीर्घकालीन वापराच्या वस्तू): 7.2% वाढ

मध्यवर्ती वस्तू: 5.23% वाढ

निष्कर्ष

फेब्रुवारी 2025 साठी भारताचे आर्थिक निर्देशक चलनवाढीत घट, सुधारित औद्योगिक उत्पादन आणि मजबूत कॉर्पोरेट महसूल दर्शवितात. अल्पावधीसाठी महागाईचा कल अनुकूल राहिला तरी, आयात वस्तूंच्या महागाईचा धोका आणि रुपयाचे अवमूल्यन भविष्यात आव्हाने निर्माण करु शकतात. विकसित होत असलेले आर्थिक परिदृश्य येत्या काही महिन्यांसाठी सावध परंतु आशावादी दृष्टिकोन सूचित करतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विदर्भात धवलक्रांती घडून आणण्यासाठी मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Mon Mar 17 , 2025
– मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याचे गडकरींच्या हस्ते भूमीपूजन नागपूर :- विदर्भात धवलक्रांती घडून आणण्यासाठी राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळ एनडीडीबी द्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले.नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथे मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते .सुमारे 550 कोटींच्या या प्रकल्पाव्दारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!