उद्योग मंत्री उदय सामंत आज नागपूर दौऱ्यावर

नागपूर :- उद्योग मंत्री उदय सामंत दि. २६ ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. सामंत यांचे मुंबई येथून सकाळी ८.५० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर रविभवन येथून सकाळी ११.३० वाजता सामंत वर्धा येथे प्रयाण करतील. वर्धा येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५.०० वाजता नागपूर जिल्हा उद्योग विभागात ते ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा’ आढावा घेतील. दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.०० वाजता सामंत यवतमाळकडे पुढील दौऱ्यासाठी प्रयाण करतील.

अब्दुल सत्तार

अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे मुंबई येथून दि.25 ऑक्टोबर रोजी रात्री ८.०५ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन होणार आहे. दि.२६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. सत्तार दुपारी १.०० वाजता कोंढाळी येथे निर्मल टेक्सटाईल पार्कची पाहणी करतील.

धर्मरावबाबा आत्राम

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे दि.२७ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथून सायंकाळी ५.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maha Governor felicitates medallists from Berlin Special Olympics

Thu Oct 26 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais felicitated 20 athletes and coaches from Maharashtra who bagged medals for the country in the ‘Special Olympics’ at Raj Bhavan Mumbai on Wednesday (25th). The Special Olympics were held for the intellectually challenged persons in Berlin in June 2023. Speaking on the occasion, the Governor said the divyang sports persons have done the State […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com