नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात औद्योगिक गुंतवणूक वाढेल – उद्योग मंत्री उदय सामंत

– राज्यात सात ठिकाणी एमआयडीसीची प्रादेशिक कार्यालये होणार

मुंबई :- नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात नव्याने उद्योग येत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने काही उद्योग नव्याने येत असल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. राज्यातील बारामती, अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य राजेश पाडवी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. नवापूर औद्योगिक क्षेत्रात नवे उद्योग येत आहेत. येत्या काळात या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

Fri Jul 5 , 2024
– 10 जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठात आयोजन गडचिरोली :-  जिल्हा कौशल्य विकास विभाग आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 जुलै 2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ येथे सकाळी 11 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये कंपन्या, महामंडळे उपस्थित राहणार आहेत. तरी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com