मराठा, कुणबी, मुलामुलींसाठी ‘इंडो जर्मन टूल रुम’ कौशल्य विकास प्रशिक्षण

– विभागात 125 जागा ; अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जून

नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व इंडो जर्मन टूल रुम यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर प्रशिक्षण केंद्राच्या 125 जागांसाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या युवक-युवतीसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षणाकरिता 29 जून 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर गटाच्या युवक-युवतीसाठी पूर्णवेळ, अनिवासी, नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 10 वी, आयटीआय, डिग्री डिप्लोमा, मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, सिव्हील इंजिनिअर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा एकूण 851 जागा असून नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी 125 जागा उपलब्ध आहेत. ‘इंडो जर्मन टूल रुम’ कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत युरोप दिन साजरा

Thu Jun 27 , 2024
– युरोपमधील देशांनी विद्यापीठांमध्ये भारत विषयक अभ्यासक्रम राबवावे – राज्यपाल रमेश बैस  मुंबई :- भारत व युरोपीय देशांचे संबंध अनेक शतकांपासून चालत आले असून भारतीय राज्यघटनेत अनेक युरोपीय देशांच्या राज्यघटनांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असून यूरोपीय राष्ट्रांनी उद्योग, व्यापाराशिवाय आता भारतातील आणि विशेषतः राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे तसेच आपल्या विद्यापीठांमध्ये भारत विषयक अभ्यासक्रम राबवावे असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com